Homeव्हिडीओ

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? उद्धव ठाकरेंचे ७ खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा, दिल्लीत झाली गुप्त बैठक!

https://youtu.be/cZ17_rKTUtA महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना प

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा पुन्हा चर्चेतपक्षीय बैठका, खासदारांशी चर्चा आणि नव्या समीकरणांची उत्सुकता
तृणमूल काँग्रेसमध्ये फूट; 20 खासदार देणार एनडीएला पाठिंबा
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला पुन्हा एकदा मोठे खिंडार पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाचे ९ पैकी तब्बल ७ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात. ७ जून रोजी दिल्लीत एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या या खासदारांमध्ये एक गुप्त बैठक झाल्याचा दावा केला जात आहे. या बैठकीत ठाकरे गटाच्या खासदारांना मोठी राजकीय ऑफर देण्यात आल्याचे समजते. यामध्ये एका खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान, तर इतर खासदारांना महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे गेल्या सहा महिन्यांपासून या खासदारांच्या संपर्कात होते आणि दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानीही यांच्यात बैठका झाल्याची चर्चा आहे. मुंबईतील दोन खासदार वगळता इतर सर्व ७ खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली असून, आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदे यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. अद्याप या घडामोडींना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी या संभाव्य पक्षबदलामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS