Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकरी संप्रदायात परिवर्तनाची घडी संत बंकटस्वामी यांनी बसवली – श्री ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्रीपुण्यतिथी उत्सवात पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प मोठ्या थाटात संपन्न

बीड : वारकरी संप्रदायातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी संत बंकटस्वामी महाराजांनी केली असून त्यांच्या कार्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन परंप

श्रीक्षेत्र नेकनूरमध्ये ‘भक्तीपंढरी’ अवतरणार; संत बंकटस्वामी महाराजांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा
लोणी बुद्रुक येथे सोमवार पासून हरिनाम सप्ताह
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी येथे रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू

बीड : वारकरी संप्रदायातील परिवर्तनाची भक्कम पायाभरणी संत बंकटस्वामी महाराजांनी केली असून त्यांच्या कार्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन परंपरा अधिक समृद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांनी केले.
बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र नेकनूर येथे संत बंकटस्वामी महाराज यांच्या 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी कीर्तन पुष्प अर्पण करताना ते बोलत होते. या वेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी, सत्यवान महाराज लाटे, नाना महाराज कदम, सुरेश महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज यादव, अच्युत महाराज घोडके, रणजीत महाराज शिंदे, वसंत महाराज शिंदे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. कीर्तनात ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर सुंदर चिंतन मांडले-
राम म्हणता रामचि होईजे । पदी बैसोनि पदवी घेईजे ॥1॥
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥2॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचते केवी ॥3॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥4॥
यावेळी महाराजांनी सांगितले की, संत बंकटस्वामी महाराजांचे जीवन अत्यंत अलौकिक होते. त्यांनी लहानपणापासूनच अध्यात्माची साधना करत गाथा, ज्ञानेश्वरी आणि भागवत यांचे सखोल अध्ययन केले. त्यांच्या काकडा भजनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत असत. त्यांच्या मधुर वाणीमुळे भजनातून समाधीचा आनंद मिळत असे. समाजात सती, संत आणि शूर हेच खरे अलंकार आहेत. जसे जंगलात परिवर्तन घडवणारा सिंह असतो, तसेच समाजात परिवर्तन घडवण्याचे कार्य संत करतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जीवनात योग्य गुरु आणि मार्गदर्शक मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून नामस्मरण हा देवप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या कीर्तनाला प्रसिद्ध गायनाचार्य अशोक महाराज ठोंबरे, भजनसम्राट हाके मामा, सतीश महाराज जाधव, यश महाराज तसेच संत बंकटस्वामी महाराज फळावरील गायक-वादक मंडळींची सुरेल साथ लाभली.

COMMENTS