कोपरगाव : येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून सात विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत आकर्षक पगाराच्या नोकरीसाठी निवड झाली आहे. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच नोकरीची संधी मिळाल्याने संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेचे यश पुन्हा अधोरेखित झाले आहे. कॉनकास्ट (इंडिया) प्रा. लिमिटेड कंपनीने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रतिक्षा रामदास पुरी व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या प्रशांत रमेश व्यापारे यांची निवड केली आहे. मॅक्स सरफेस ट्रिटमेंट प्रा. लिमिटेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या निलेश दीपक रासकर, दीप बाबासाहेब सोनवणे व सुयश प्रदीप थोरात यांना संधी मिळाली आहे. तर आर्मस्ट्रॉन्ग डिमॅटिक लिमिटेड या कंपनीत मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या सक्षम महेंद्र कुलकर्णी व आदित्य बाळासाहेब वारूळे यांची निवड झाली आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास तसेच उद्योगक्षेत्रातील गरजांनुसार कौशल्य विकासाचे मार्गदर्शन केले जाते. नामांकित कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यानुसार विद्यार्थ्यांना तयार केले जात असल्याने संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने संधी मिळत असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे आव्हानात्मक असताना संस्थेने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यावर भर दिल्याचे या यशातून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्यांमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोपरगाव : येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारातून सात विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत आकर्षक पगाराच्या नोकरीसाठी निवड झाली आहे. अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच नोकरीची संधी मिळाल्याने संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेचे यश पुन्हा अधोरेखित झाले आहे.
कॉनकास्ट (इंडिया) प्रा. लिमिटेड कंपनीने सिव्हिल इंजिनिअरिंगच्या प्रतिक्षा रामदास पुरी व स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या प्रशांत रमेश व्यापारे यांची निवड केली आहे. मॅक्स सरफेस ट्रिटमेंट प्रा. लिमिटेड कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या निलेश दीपक रासकर, दीप बाबासाहेब सोनवणे व सुयश प्रदीप थोरात यांना संधी मिळाली आहे. तर आर्मस्ट्रॉन्ग डिमॅटिक लिमिटेड या कंपनीत मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या सक्षम महेंद्र कुलकर्णी व आदित्य बाळासाहेब वारूळे यांची निवड झाली आहे.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाकडून विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी, व्यक्तिमत्व विकास तसेच उद्योगक्षेत्रातील गरजांनुसार कौशल्य विकासाचे मार्गदर्शन केले जाते. नामांकित कंपन्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यानुसार विद्यार्थ्यांना तयार केले जात असल्याने संजीवनीच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने संधी मिळत असल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणे आव्हानात्मक असताना संस्थेने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यावर भर दिल्याचे या यशातून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्यांमुळे पालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून त्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे व व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS