कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती एस.के.गांधी कला, अमोलक विज्ञान व पी. एच.गांधी वाणिज्य महाविद्य

कडा: आष्टी तालुक्यातील कडा येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती एस.के.गांधी कला, अमोलक विज्ञान व पी. एच.गांधी वाणिज्य महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राला वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका (पत्रकारिता) अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारितेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. महाविद्यालयात सध्या मुक्त विद्यापीठाचे एकूण 19 शिक्षणक्रम सुरू असून महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या ज्ञानगंगा घरोघरी या ब्रीदवाक्यानुसार अभ्यासकेंद्र प्रभावीपणे कार्यरत असून पत्रकारिता पदविका हा अभ्यासक्रम त्यामध्ये महत्त्वाची भर ठरणार आहे. या अभ्यासक्रमासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम,पूर्वतयारी शिक्षणक्रम,बारावी किंवा समकक्ष परीक्षा, 1975 पूर्वीची अकरावी उत्तीर्ण अथवा एसएससीनंतर शासनमान्य किमान दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण अशी विविध शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरण्यात आली आहे. या अभ्यासकेंद्राच्या यशस्वी वाटचालीसाठी संस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष व संचालक मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जवाहरलाल भंडारी तसेच अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक प्रा.डॉ.अशोक कोरडे यांच्या प्रयत्नांमुळे हा अभ्यासक्रम सुरू होऊ शकला आहे.या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी विलंब न करता प्रवेश निश्चित करून अधिक माहितीसाठी केंद्रसंयोजक प्रा.डॉ.अशोक कोरडे किंवा तंत्र सहाय्यक ज्ञानेश्वर खंदारे यांच्याशी गांधी महाविद्यालय, कडा येथील अभ्यासकेंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS