बीड: महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक राजकीय व शिक्षण क्षेत्रात वैभवशाली कामगिरी करणारे काँग्रेस पक्षचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल डॉक्टर ज्ञानदे

बीड: महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक राजकीय व शिक्षण क्षेत्रात वैभवशाली कामगिरी करणारे काँग्रेस पक्षचे ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील ऊर्फ डी वाय पाटील साहेब यांनी काल कोल्हापुर येथे वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असुन त्यांच्या स्मृतीस बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना गणेश बजगुडे पाटील म्हणाले की, डी वाय पाटील साहेबांनी शिक्षणाचे महत्त्व जाणुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनियरिंगसह वेगवेगळ्या क्षेत्रात महत्वाचे व दर्जेदार शिक्षण मिळावे त्यांना नोकर्यांची संधी उपलब्ध व्हावी म्हणुन त्यांनी पुणे, मुंबई, कोल्हापुर सारख्या भागात शेकडो शाळा कॉलेजेस उभा केली. शिक्षणासोबतच क्रीडा, आरोग्य व सामाजिक जीवनात देखील त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असुन ते कोल्हापुरचे महापौर, आमदार, मंत्री यासह बिहार, पश्चिम बंगाल व त्रिपुरा राज्याचे गव्हर्नर (राज्यपाल) म्हणुन देखील त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी शेवटपर्यंत काँग्रेस पक्ष व विचाराशी प्रामाणिक राहुन काम केले. त्यांचे आणि खासदार रजनीताई पाटील परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे व पारिवारिक संबंध होते त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्राची कधीही न भरुन निघणारी मोठी हानी झाली असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS