Homeताज्या बातम्या

सीईओ साहेब, नगरपालिका मृत्यूची वाट पाहतेय का..?

बीड: बीड शहरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक इमारतींची अवस्था चिंताजनक असतानाही नगरपाल

कर्जत न्यायालयाच्या इमारतीसाठी निधी मंजूर करणार – पालकमंत्री विखे पाटील
करंजी ग्रामपंचायतीकडून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना विविध विकासकामांसाठी निधीची मागणी
पंढरपुरात पूजा सुरू असताना जवानाची आत्महत्या; आषाढी एकादशीच्या बंदोबस्तावरील घटनेने खळबळ

बीड: बीड शहरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक अवस्थेतील इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक इमारतींची अवस्था चिंताजनक असतानाही नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी (सीईओ), नगररचनाकार विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून अद्याप त्यांच्या संरचनात्मक सुरक्षिततेची तपासणी करण्यात आलेली नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात दमदार पावसाचा जोर कायम असताना जीर्ण इमारती कोसळण्याची शक्यता वाढली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दि. 10 जुलै 2026 रोजी नगर रोडवरील सुमारे 30 वर्षे जुन्या बावळे कॉम्प्लेक्समधील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम असलेल्या गाळ्याचा स्लॅब अचानक कोसळला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कोसळलेल्या भागातून बाहेर आलेल्या गंजलेल्या लोखंडी सळ्या आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेनंतर संबंधित इमारतीची संरचनात्मक तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही होणे अपेक्षित होते. मात्र, महिनाभर उलटून गेल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. बावळे कॉम्प्लेक्समध्ये अनेक व्यापारी आस्थापने असून काही कुटुंबेही वास्तव्यास आहेत. त्यामुळे इमारतीची सुरक्षितता धोक्यात असल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल नागरिक करत आहेत. आवश्यक त्या इमारती रिकाम्या करून तात्काळ पाडा बीड शहरातील सर्व धोकादायक, जुन्या आणि जीर्ण इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. ज्या इमारती धोकादायक आढळतील त्या नियमानुसार रिकाम्या करून पाडण्याची प्रक्रिया त्वरित राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष मैदानात उतरून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS