हेरगिरी करणे हा देशद्रोहच : राहुल गांधी

Homeताज्या बातम्यादेश

हेरगिरी करणे हा देशद्रोहच : राहुल गांधी

भारत सरकारकडून इस्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी : न्यूयार्क टाइम्सचा दावानवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतातील बडे राजकारणी, उद्योगपती, पत्रकारांसह विविध

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना
पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं, गोपीचंद पडळकरांचा तुफान हल्ला l पहा LokNews24
दोन दिवस आधीच मॉन्सून महाराष्ट्रात

भारत सरकारकडून इस्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी : न्यूयार्क टाइम्सचा दावा
नवी दिल्ली/प्रतिनिधी : भारतातील बडे राजकारणी, उद्योगपती, पत्रकारांसह विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर भारतीय राजकारण तापले होते. मात्र हे प्रकरण मागे पडल्यानंतर अमेरिकेतील न्यूयार्क टाईम्सने भारत सरकारने इस्त्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी केल्याचा दावा केला आहे. यानंतर पुन्हा एकदा भारतीय राजकारण तापले असून, हेरगिरी करणे, हा देशद्रोहच असल्याची जळजळीत टीका काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर हल्ला केला. मोदी सरकारने हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली. यात राजकीय नेते, सामान्य नागरिक, लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था या सर्वांचीच हेरगिरी करण्यात आली. फोन टॅप करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, लष्कर, न्यायपालिका यांना लक्ष्य करण्यात आले. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्सने एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यात पेगाससवर नवा खुलासा टाकला आहे. भारत सरकारने 5 वर्षापूर्वी मिसाईल सिस्टिम सहीत डिफेन्स डिलसाठी 2 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रुपाने 2017 मध्ये इस्रायली स्पायवेअर पेगाससची खरेदी केली होती, असे या वृत्तात म्हटले आहे. फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनने स्पायवेअर खरेदी केल्याचं वर्षभराच्या तपासाअंती समोर आले आहे. देशांतर्गत देखरेखीच्या वापराच्या नावाने एफबीआयने या सॉफ्टवेअरची टेस्टिंगही केली आहे. मात्र गेल्यावर्षी कंपनीने पेगाससचा वापर न करण्याचा निर्णय घेतला. या स्पायवेअरचा आपल्या विरोधकांच्या विरोधातच जगभर वापर करण्यात आला आहे. पोलंड, हंगेरी आणि भारतासहीत अनेक देशांना पेगाससची सुविधा देण्यात आल्याचंही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, भारत सरकार आणि इस्रायली सरकारने अद्यापपर्यंत पेगाससची खरेदी विक्री केल्याचे मान्य केलेले नाही.
दरम्यान, यापूर्वी सर्वात प्रथम न्यूज पोर्टल ‘द वायर’ने पेगासस बाबत दावा केला होता. 2017 ते 2019 ह्या दोन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारनं जवळपास 300 भारतीय नागरिकांची हेरगिरी केली तीही ते वापरत असलेल्या फोनच्या माध्यमातून. यात पत्रकार आहेत, विरोधी पक्षाचे नेते आहेत, वकिल आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, उद्योगपती आहेत आणि जजेसही आहेत. पेगासस नावाचं स्पायवेयर आहे त्याच्या माध्यमातून फोन हॅक करुन पाळत ठेवली गेलीय. विशेष म्हणजे 2019 लाही राज्यसभेत हा मुद्दा गाजला होता. आणि आता पुन्हा त्यावर वादळ उठलेले आहे. पेगासस हे स्पायवेयर इस्त्रायली सॉफ्टवेअर आहे. 2019 मध्ये व्हाटस अ‍ॅपने पेगासस बनवणार्‍या कंपनीच्याविरोधात खटला दाखल केला होता.

हे वॉटरगेट आहे का? : सुब्रमण्यम स्वामी यांचा सवाल
मोदी सरकारने न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. इस्रायलची कंपनी एनएसओने 300 कोटीला पेगाससची विक्री केली. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेची दिशाभूल केल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. हे वॉटरगेट आहे का? असा सवाल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

COMMENTS