Homeताज्या बातम्या

जोर्वे संस्कृतीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

संगमनेर : १ जून हा अनेकांचा वाढदिवस असतो, मात्र गावातील सर्व नागरिक आणि महिलांनी एकत्र येत ४११ जणांना फेटे बांधून पारंपरिक आनंद उत्सवात सामूहिक व

संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे; तर उपाध्यक्षपदी शाम पोळ
जनतेचा कौल विचारांसाठी होता, पक्षांतरासाठी नव्हे; शिर्डी लोकसभा मतदारसंघातील घडामोडींवर काँग्रेस नेत्या प्रभावती घोगरे यांची परखड टीका
कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती

संगमनेर : १ जून हा अनेकांचा वाढदिवस असतो, मात्र गावातील सर्व नागरिक आणि महिलांनी एकत्र येत ४११ जणांना फेटे बांधून पारंपरिक आनंद उत्सवात सामूहिक वाढदिवस साजरा करणे, ही एक आदर्श परंपरा आहे. जोर्वे संस्कृतीचा जागतिक पातळीवर मोठा गौरव आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच नागरिकांनी आपली समृद्ध परंपरा जपत पुढची पिढी अधिक सक्षम घडवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जोर्वे येथील लक्ष्मीआई मंदिरामध्ये गावातील ४११ नागरिक व महिलांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या सोहळ्याला काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात, इंद्रजीत थोरात, शरद थोरात, एमआयडीसीचे चेअरमन के. के. थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी वाढदिवस असलेल्या सर्व नागरिकांचा शाल, बुके आणि फेटे बांधून सत्कार करण्यात आला व केक कापण्यात आला.

याप्रसंगी बोलताना थोरात म्हणाले की, जोर्वे गावाने कायमच प्रेम देऊन मोठा पाठिंबा दिला आहे. थोरात परिवाराची नाळ या गावाशी कायम जोडलेली असून, गावच्या विकासासाठी आणि विविध मंदिरांच्या उभारणीसाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहिलो आहोत. गावच्या विकासात कधीही भेदभाव केला नाही. कुटुंब सांभाळताना पुढची पिढी सुसंस्कारीत घडली पाहिजे, याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.

COMMENTS