Homeताज्या बातम्या

कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती

कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्जत तालुक्यात संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज झालेल्या तालुका पदाधिकारी बैठकीत आग

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आग्रही मागणी
भगवानगडासाठी प्रतापराव ढाकणे यांची ५१ लाखांची देणगी; ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे काम प्रगतिपथावर
शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा; सरपंच जयसिंग मापारी यांचे प्रतिपादन

कर्जत : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्जत तालुक्यात संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आज झालेल्या तालुका पदाधिकारी बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणी, बूथस्तरावरील नियोजन आणि जनसंपर्क वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात पक्ष अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला.

अहिल्यानगर जिल्हा संपर्क अध्यक्ष नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी कार्यकर्त्यांना संघटन विस्तारासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. तालुका अध्यक्ष सचिन सटाले यांनी प्रास्ताविक भाषणातून तालुक्यातील संघटनात्मक स्थितीचा आढावा घेत आगामी काळातील नियोजन स्पष्ट केले.

बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष निखिल जगधने यांनी बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढविण्याची गरज अधोरेखित केली. “तळागाळातील कार्यकर्ताच पक्षाची खरी ताकद आहे. गावागावात संपर्क वाढवून मनसेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवावी,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहराध्यक्ष धरम परदेशी, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब उघडे, तालुका सरचिटणीस विशाल भुसारे, मिरजगाव शहराध्यक्ष नितीन पिसे, विभाग अध्यक्ष तुषार जाधव, गणप्रमुख बाबासाहेब बचाटे, शाखाध्यक्ष अंबादास गांगर्डे, शेतकरी सेना अध्यक्ष लखन जंजिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचा तसेच गावनिहाय संपर्क अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला.

COMMENTS