Homeताज्या बातम्या

पाथर्डी पोलिसांचा अवैध दारू व्यवसायावर छापा; गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करून आरोपीला अटक

पाथर्डी : अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाथर्डी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. शंकरवाडी परिस

अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई; ‘गर्भलिंग निदान’ प्रकरणी आणखी दोघांना अटक, आरोपींची संख्या २१ वर, ७ डॉक्टरांचा समावेश
शेवगाव दूध भेसळ प्रकरणातील तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाकडून दखल; अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या चौकशीचे निर्देश
खरवंडी परिसरात स्वतंत्र पोलिस ठाण्याची स्थापना करावी : आव्हाड

पाथर्डी : अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाथर्डी पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. शंकरवाडी परिसरातील गावठी हातभट्टी उद्ध्वस्त करत पोलिसांनी सुमारे १ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील गोपाळ वस्ती, शंकरवाडी येथील शिवारात अवैधरित्या गावठी दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकला.

या कारवाईत जालिंदर दत्तात्रय लोणारे (वय २२, रा. गोपाळ वस्ती, शंकरवाडी) याला दारू निर्मिती करताना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावरून ७०० लिटर कच्चे रसायन (किंमत ७० हजार रुपये), १५० लिटर तयार गावठी दारू (किंमत ३० हजार रुपये), नवसागरच्या वड्या व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारे कच्चे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, देवराव ढगे, संभाजी कुसाळकर, संदीप कानडे, भगवान टकले, संदीप कळमकर व पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

COMMENTS