Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उन्हाच्या झळांत पशुपक्ष्यांसाठी ‘जीवनदायी’ पाणवठा

अकोले : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी राज्य होरपळून निघत असताना माणसांसह पशुपक्ष्यांचेही जीवन कठीण झाले आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या पक्षी व लहान प्राण्यांसाठी मवेशी येथील पर्यावरणप्रेमी युवक राहुल राऊत यांनी श्रमदानातून पाणवठा उभारून संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे. पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांची अवस्था पाहून राहुल राऊत यांनी स्वतः पुढाकार घेत फावड्याच्या साहाय्याने छोटा जलतळ तयार केला. सुमारे सात ते आठ फूट आकाराचा व कमी खोलीचा हा तळा पूर्णपणे श्रमदानातून उभारण्यात आला असून त्यामध्ये नियमित पाणी भरले जात आहे. त्यामुळे पक्षी, खारी व इतर लहान प्राण्यांना सहज पाणी उपलब्ध होत आहे. मवेशी परिसरातील मारुती मंदिर तसेच उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये यापूर्वीच राऊत यांनी १०५ झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात जीवसृष्टीचा वावर वाढला; मात्र वाढत्या उन्हामुळे पाण्याची कमतरता जाणवताच त्यांनी त्वरित जलतळ उभारण्याचा निर्णय घेतला. या पाणवठ्यामुळे परिसरात पुन्हा सजीवपणा दिसू लागला असून सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांची किलबिल, खारींची वर्दळ आणि प्राण्यांची हालचाल पाहायला मिळत आहे. निसर्गाशी सुसंवाद साधणारे सुंदर चित्र येथे निर्माण झाले आहे. दरम्यान, राहुल राऊत यांनी आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करून ती जगविण्याचे कार्य केले आहे. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था अशा विविध उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची दखल परिसरासह जिल्हाभर घेतली जात आहे.

कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश
गुरुकुलमध्ये आधुनिक संगणक लॅबचे उद्घाटन 

अकोले : उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी राज्य होरपळून निघत असताना माणसांसह पशुपक्ष्यांचेही जीवन कठीण झाले आहे. पाण्याअभावी त्रस्त झालेल्या पक्षी व लहान प्राण्यांसाठी मवेशी येथील पर्यावरणप्रेमी युवक राहुल राऊत यांनी श्रमदानातून पाणवठा उभारून संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले आहे.

पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या पक्ष्यांची अवस्था पाहून राहुल राऊत यांनी स्वतः पुढाकार घेत फावड्याच्या साहाय्याने छोटा जलतळ तयार केला. सुमारे सात ते आठ फूट आकाराचा व कमी खोलीचा हा तळा पूर्णपणे श्रमदानातून उभारण्यात आला असून त्यामध्ये नियमित पाणी भरले जात आहे. त्यामुळे पक्षी, खारी व इतर लहान प्राण्यांना सहज पाणी उपलब्ध होत आहे.

मवेशी परिसरातील मारुती मंदिर तसेच उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये यापूर्वीच राऊत यांनी १०५ झाडांचे वृक्षारोपण केले होते. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात जीवसृष्टीचा वावर वाढला; मात्र वाढत्या उन्हामुळे पाण्याची कमतरता जाणवताच त्यांनी त्वरित जलतळ उभारण्याचा निर्णय घेतला.

या पाणवठ्यामुळे परिसरात पुन्हा सजीवपणा दिसू लागला असून सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांची किलबिल, खारींची वर्दळ आणि प्राण्यांची हालचाल पाहायला मिळत आहे. निसर्गाशी सुसंवाद साधणारे सुंदर चित्र येथे निर्माण झाले आहे.

दरम्यान, राहुल राऊत यांनी आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक झाडांचे वृक्षारोपण करून ती जगविण्याचे कार्य केले आहे. वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था अशा विविध उपक्रमांमुळे त्यांच्या कार्याची दखल परिसरासह जिल्हाभर घेतली जात आहे.

COMMENTS