Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ गोडसे; तर उपाध्यक्षपदी शाम पोळ

श्रीगोंदा : संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ संजय गोडसे यांची, तर तालुका उपाध्यक्षपदी शाम पोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्जतमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक; संघटनात्मक बांधणीसह आगामी निवडणुकांबाबत रणनीती
शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा; सरपंच जयसिंग मापारी यांचे प्रतिपादन
वृद्धांसाठी घरपोच ‘हयाती’ची नोंदणी; कर्जतमधील नगरसेविका नीता कचरे यांचा अनोखा उपक्रम

श्रीगोंदा : संभाजी ब्रिगेडच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोमनाथ संजय गोडसे यांची, तर तालुका उपाध्यक्षपदी शाम पोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात ‘बुधभूषण’ ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक अनावरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमात हा नियुक्ती सोहळा पार पडला.

या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, श्रीगोंदा मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेश अण्णा सुडगे, माजी सरपंच बापूराव फंड, सोसायटी चेअरमन कैलास मते, जिल्हा संघटक गणेश पारे यांच्यासह श्रीगोंदा तालुका व टाकळी लोणार परिसरातील अनेक मान्यवर आणि शंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सोमनाथ गोडसे यांनी नियुक्तीबद्दल सर्वांचे आभार मानले. आगामी काळात श्रीगोंदा तालुक्यात गावोगावी नवीन कार्यकर्ते जोडून संभाजी ब्रिगेडच्या नवीन शाखा सुरू करण्याचा आणि संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या.

COMMENTS