सुपा : शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या संघर्षाला यश मिळत राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण येथील ऐतिहासिक शिवरस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ उत्सा

सुपा : शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या संघर्षाला यश मिळत राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण येथील ऐतिहासिक शिवरस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात झाला. हा केवळ रस्त्याच्या कामाचा प्रारंभ नसून शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन संघर्ष, त्याग आणि एकजुटीचा विजय असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शिव पाणंद शेतरस्ता चळवळीमुळे ग्रामीण विकासाला नवी दिशा मिळाली असल्याचे राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले की, राळेगणसिद्धी–नारायणगव्हाण येथील शिवरस्त्याच्या संघर्षातूनच राज्यव्यापी चळवळीची प्रेरणा मिळाली. पारनेर तालुक्यात सुरू झालेला हा लढा आज राज्यभर पोहोचला असून शेतरस्त्यांच्या प्रश्नावर हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण झाले आहे. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी कामाची पाहणी करून दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता उभारण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपसरपंच संपतराव उगले, भाऊसाहेब गाजरे, संभाजी गाजरे यांच्यासह शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य प्रसिद्धीप्रमुख रवींद्र खुडे, विजय शेलार व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS