Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाच्या अयोध्या पौळ यांना मारहाण

मुंबई ः मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून येतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांना प

राजकीय विरोधाभास
चोरीचा बनाव फसला…फिर्यादीच झाला आरोपी…
७ महिन्याच्या चिमुरड्यावर तलवारीनं वार करून निर्दयी हत्या I LOKNews24

मुंबई ः मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा उफाळून येतांना दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या अयोध्या पौळ यांना पुन्हा एकदा मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पौळ यांनी आपल्याला शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी घरात शिरून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मुंबईतील लोकसभा निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असताना ही घटना घडल्यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. अयोध्या पौळ यांनी फेसबुक लाइव्हद्वारे आपल्याला मारहाण झाल्याची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या घरात यामिनी जाधव यांच्या प्रचाराची पत्रके टाकली. मी त्यांना विरोध केला असता त्यांनी मला घरात घुसून मारहाण केली. त्यात माझ्या अंगावर अनेक ठिकाणी ओरखडे उमटले. त्यांनी माझा मोबाइल चोरुन नेऊन त्यातील मारहाणीचा प्रसंग डिलीट करून टाकला, असा दावा पौळ यांनी केला आहे.

COMMENTS