Homeताज्या बातम्या

अकोले पोलिसांची मोठी कारवाई; कोतूळमध्ये सव्वा लाखांचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा आणि ७ गॅस सिलिंडर जप्त

अकोले : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका गाळ्यावर छापा टाकून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठ

पत्रकार विनोद डाकोरे यांना ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर; लोहा शहरासह नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
RTO कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप; राज्यातील वाहन परवाना, नोंदणीसह दैनंदिन कामकाज ठप्प होणार
NEET परीक्षेच्या धक्क्यातून विद्यार्थिनीची आत्महत्या; लातूरमधील दुर्दैवी घटना

अकोले : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे पोलिसांनी शुक्रवारी सकाळी एका गाळ्यावर छापा टाकून प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईत एकूण १ लाख ३९ हजार ४६४ रुपयांचा मुद्देमाल आणि ७ घरगुती गॅस सिलिंडर हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी समीर काझी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतूळ व परिसरात प्रतिबंधित गुटख्याची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने शुक्रवारी सकाळी कोतूळ गावातील एका संशयास्पद गाळ्यावर छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी गाळ्याच्या मालकाकडे चौकशी केली असता, ही जागा समीर काझी याला भाडेतत्त्वावर दिल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी समीर काझी घटनास्थळावरून पसार झाला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस अंमलदार वाकचौरे, जोरगिल, शेंगाळ आणि महिला पोलीस कर्मचारी सुहास गोरे यांच्या पथकाने केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात समीर काझीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे करीत आहेत.

COMMENTS