शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत जरुड येथील स्वप्नपूर्ती लाँन्स येथे दि. 5 मे रोजी

शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियान अंतर्गत जरुड येथील स्वप्नपूर्ती लाँन्स येथे दि. 5 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आले . या शिबिरास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. जरुड परिसर येथील स्वप्नपूर्ती लाँन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये शेतकरी,विद्यार्थी,ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेतला .
राज्य शासनाने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख,पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे अभियान सुरू केले आहे . नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देणे,प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, श्री शैलेश शूर्यवंशी उपजिल्हाधिकारी,बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव स्वतः अनेक ठिकाणी हजेरी लावत असतात.जरुड येथे आयोजित शिबिराने या उद्दिष्टांना प्रत्यक्ष स्वरूप दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.कार्यक्रमास बीडचे कर्तव्यदक्ष तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली . कार्यक्रमाच्या वेळी,नायब तहसीलदार सुहास हजारे साहेब, प्रशांत जाधवर ,संजय गांधी विभागाचे अण्णासाहेब वंजारे साहेब, सुरेंद्र डोके , संभाजी थोटे ; मंडळ अधिकारी पुरुषोत्तम आंधळे , जितेंद्र वाघ , सचिन सानप, ग्राम महसूल अधिकारी भगवानराव टाक ,शेख जावेद ,ओमकार गायके , पल्लवी सौन्दरमल ,रुपाली जाधव , शाहु निलेवाड तसेच तालुक्यातील मंडळ अधिकारी वं तलाठी यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाची रुपरेषा मांडताना तहसीलदार शेळके यांनी शिबिराचे महत्त्व व उद्देश याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले . लक्ष्मीआई तांडा येथील बंजारा महिलांनी त्यांचे पारंपरिक वेशभूषा मध्ये विशेष स्वागत केले. सदर कार्यक्रमास शांतीब्रम्ह नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडी , अखंडानंद गिरी महाराज भवानी गड यांची विषेश उपस्थिती लाभली . तसेच जरुड येथील सरपंच श्रीराम काकडे उपसरपंच पंजाब काकडे , जालिंदर काकडे,सुरेश काकडे , शिवणी येथील सरपंच अजय सुपेकर, विजय सुपेकर, उपसरपंच सुभाष डोळस,भवानवाडी येथील सरपंच गणेश जगताप,उपसरपंच बालासाहेब मुंडे,नाळवंडी येथील सरपंच राजेंद्र राऊत,उपसरपंच गोरख काळे,लक्ष्मीआई तांडा येथील सरपंच स्वरूप राठोड,बाभळखुंटा येथील माजी सरपंच हनुमान बोरगे , बोरफडी येथील सरपंच कैलास घुगे ,राष्ट्रवादी जिल्हा संघटक बप्पासाहेब घुगे , हिवरापहाडी येथील सरपंच अशोक शिंदे ,पोलीस पाटील बबन पाटील शिंदे,ढेकणमोहा येथील माजी सरपंच प्रकाश ठाकुर,दिनेश पिसाळ,रमेश पिसाळ सर,चत्रभुज थापडे , ढेकणमोहा तांडा येथील सरपंच दयाराम पवार,ब्रम्हगांव येथील बंडु घोरड सर , तसेच काळेगाव हवेली येथील बद्रीनारायण मोटारकर व सामाजिक कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर शिबीर चा सर्वांनी लाभ घेणे बाबत आवाहन केले . तसेच कार्यक्रमास महसूल मंडळातील आजी, माजी सरपंच तसेच महसूल विभागातील व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाळवंडी महसूल मंडळातील सर्व गावांचे उपसरपंच, पोलीस पाटील,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी,महसूल सेवक, महावितरण कर्मचारी , आरोग्य विभाग कर्मचारी,अंगणवाडी पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविका,आशा कार्यकर्त्या,शेतकरी गट,विद्यार्थी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले . नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला लोकाभिमुख स्वरूप प्राप्त झाले.भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांची स्वतंत्र नोंद घेतली . या शिबिराच्या माध्यमातून विविध विभागांचे माहितीपर स्टॉल्स उभारण्यात आले होते.महसूल विभागाशी संबंधित जमीन नोंदणी , वारस नोंद,डिजिटल सातबारा उतारे , विविध दाखले व प्रमाणपत्रे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या आणि संबंधित अधिकार्यांनी त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले,शिबिरामध्ये महसूल विभागाच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.यामध्ये जिवंत सातबारा,मयत खातेदार कमी करणे,वर्ग दोन चे वर्ग एक मध्ये रूपांतर,वारस फेरफार,पाणी नोंद , नोंदणी प्रक्रिया,वसुली पावत्या,सेवा मित्र प्रमाणपत्र,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,पानंद रस्ते योजना,रस्त्यांच्या नोंदी,केवायसी प्रक्रिया,आधार शिबिर,लाभ योजना माहिती,अभिलेख दुरुस्ती,मोफत आरोग्य तपासणी,घरकुल मंजुरी , गायरान मंजुरी आदेश तसेच शेततळे योजनांची माहिती देण्यात आली . याशिवाय डिजिटल सातबारा उतार्यांचे वाटप,विविध योजनांतील प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली . संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ योजना लाभार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला . प्रास्ताविक करताना मंडळ अधिकारी पुरूषोत्तम आंधळे यांनी नमूद केले की,गावकर्यांपर्यंत जाऊन आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.यामुळे गोरगरीब लाभार्थी यांना निश्चितच लाभ होईल.तसेच त्यांनी नमूद केले की बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बीडला नियुक्ती झाल्यापासूनच अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या , त्याचाही लाभ जनतेला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे.एकंदरीत रित्या या शिबिरास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे या शिबिराचे फलित बघायला मिळाले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसुल अधिकारी रुपाली जाधव तर सर्व उपस्थितीतांचे आभार मंडळ अधिकारी व तलाठी,मंडळ अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम आंधळे यांनी मानले.

COMMENTS