Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जीडीपी 6.9 तर किरकोळ महागाई 4.6 टक्के राहण्याची शक्यतारिझर्व्ह बँकेचा अंदाज ; व्याजदरात कोणतीही कपात नाही

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आपले पतधोरण जाहीर केले असून, या पतधोरणात कोणताही बदल न करता, व्याजदर जैसे थे ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय रिझर्

रिझर्व्ह बँक आज जाहीर करणार पतधोरण
दोन जहाजांद्वारे इराणी तेल भारतात‘फेलिसिटी’ आणि ‘जया’जहाजे भारतीय बंदरांत दाखल
महागाईचा भडका उडणार? सावधान! लवकरच महागणार पेट्रोल-डिझेल

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आपले पतधोरण जाहीर केले असून, या पतधोरणात कोणताही बदल न करता, व्याजदर जैसे थे ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून जीडीपी 6.9 टक्के तर किरकोळ महागर्र् 4.6 टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्न संजय मल्होत्रा यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
रिझर्व्ह बँकेचे राज्यपाल संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढावा सादर करताना सांगितले की, 2026-27 या आर्थिक वर्षात देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर सुमारे 6.9 टक्के राहील. यापूर्वीचा अंदाज यापेक्षा अधिक होता, मात्र जागतिक भू-राजकीय तणाव, पुरवठा साखळीतील अडथळे आणि वाढत्या खर्चामुळे विकासाचा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. पश्‍चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक व्यापार मार्गांवर परिणाम झाला आहे. विशेषतः महत्त्वाच्या सागरी मार्गांमध्ये निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मालवाहतूक खर्च आणि विमा खर्च वाढले आहेत. याचा थेट परिणाम निर्यातीवर होण्याची शक्यता असून, उद्योग क्षेत्रावर त्याचा दबाव जाणवू शकतो. ऊर्जा व इतर कच्च्या मालाच्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्चात वाढ होऊन औद्योगिक वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण वाढ, कररचनेतील सुसूत्रता, उद्योगांचा वाढलेला क्षमता वापर आणि वित्तीय संस्थांची भक्कम स्थिती यामुळे देशांतर्गत मागणी टिकून राहील, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धोरणात्मक उपाययोजना आणि नव्या क्षेत्रांना दिलेले प्रोत्साहन दीर्घकालीन विकासासाठी अनुकूल ठरणार असल्याचेही नमूद करण्यात आले. तिमाहीनिहाय वाढीचा अंदाज मांडताना पहिल्या तिमाहीत 6.8 टक्के, दुसर्‍या तिमाहीत 6.7 टक्के, तिसर्‍या तिमाहीत 7.0 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 7.2 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. यावरून वर्षाच्या उत्तरार्धात आर्थिक गती काहीशी वाढण्याची शक्यता व्यक्त होते. मात्र जागतिक वित्तीय बाजारातील अस्थिरता, भांडवली प्रवाहातील चढउतार आणि चलनातील हालचाली यामुळे धोके कायम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. चलनविषयक धोरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेताना प्रमुख व्याजदर 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. महागाईच्या आघाडीवरही रिझर्व्ह बँकेने सावध अंदाज व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर सुमारे 4.6 टक्के राहण्याची शक्यता आहे

जागतिक आर्थिक आव्हाने कायम
जागतिक स्तरावर वाढत्या किमती, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि मंदावलेली आर्थिक वाढ या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे. तरीही, देशांतर्गत मागणीची ताकद, वित्तीय प्रणालीची स्थिरता आणि सरकारी धोरणांचा आधार यामुळे भारतीय अर्थव्यवस्था तुलनेने सक्षम राहील, असा विश्‍वास रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. एकूणच, 2026-27 हे वर्ष आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे असली, तरी योग्य धोरणात्मक पावले आणि अंतर्गत बळावर अर्थव्यवस्था स्थिरतेकडे वाटचाल करेल, असा आशावाद या आढाव्यातून व्यक्त करण्यात आला आहे.

COMMENTS