Homeताज्या बातम्या

’निमा भवन’ येथे जागतिक योग दिन उत्साहात साजराखा. डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेने योग साधकांचा उत्स्फूर्त सहभाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर साजर्‍या होणार्‍या जागतिक योग दिनानिमित्त नांदेड येथील निमा भवन येथे ’गजानन पाटील संचलित योग’ संस्थेच्या वतीने भव्य योग कार

कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरानिरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेकडो योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग
लिंगायत हटगर कोष्टी समाजाचा सन्मान सोहळा
जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरचे भव्य योग शिबिर; 500 हून अधिक योगसाधकांचा  सहभाग



आंतरराष्ट्रीय स्तरावर साजर्‍या होणार्‍या जागतिक योग दिनानिमित्त नांदेड येथील निमा भवन येथे ’गजानन पाटील संचलित योग’ संस्थेच्या वतीने भव्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या प्रेरणेतून आयोजित या कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह मोठ्या संख्येने योग साधकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
‘स्वस्थ आरोग्यासाठी योग’ हा संदेश देणार्‍या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रसिद्ध योग प्रशिक्षक गजानन पाटील यांनी योगशास्त्राचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. संस्कृत श्लोकांच्या माध्यमातून त्यांनी योगाचे आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक लाभ उपस्थितांना समजावून सांगितले. यानंतर योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांसारख्या विविध योगिक क्रियांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक घेण्यात आले. गजानन पाटील यांच्या 21 वर्षांच्या योग अनुभवाचा लाभ उपस्थितांना मिळाला. योग साधकांनी शांतचित्ताने आणि उत्साहाने सर्व क्रियांमध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रमात निमा संघटनेचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रगतीशील शेतकरी, व्यापारी तसेच महिला वर्गाची उल्लेखनीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निमा भवन प्रशासनाने सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांना प्रसादरूप फलाहार देण्यात आला. यावेळी संतुलित आहार, निरोगी जीवनशैली आणि दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व याविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ. हरदीपसिंघ खालसा, डॉ. शेखर चौधरी, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अविनाश वडजे, डॉ. संजय देलमाडे, डॉ. श्रीराम कल्याणकर, डॉ. सुनील पिंपळे, डॉ. स्वरूपा जाधव, गायत्री कदम,  सारिका यादव,  आशा खंदारे, सुरेखा भोसले, शिला गायकवाड, मीना कोणापुरे, अनुपमा जैन, संतराम गीते, जगदीश जाजू, प्रशांत जैन, दिगांबर शिंदे, जयवंत सूर्यवंशी, सचिन डाखोरे यांच्यासह नांदेड शहरातील विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS