Homeताज्या बातम्या

मुदखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अवैध रेती उत्खननाविरोधात 2.90 कोटींचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. या कारवाईत तब्ब

 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार
निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल


जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात मुदखेड पोलिसांनी मोठी आणि धाडसी कारवाई करत रेती माफियांना जबरदस्त दणका दिला आहे. या कारवाईत तब्बल 2 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खुजडा शिवारात सापळा रचून अवैध रेती उत्खनन करणार्‍यांवर छापा टाकला. कारवाईदरम्यान एक जेसीबी मशीन, एक ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण सुमारे 2 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित वाहनांना ताब्यात घेतले. अवैध रेती उत्खननामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून शासनाच्या महसुलालाही फटका बसत आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून संबंधित आरोपींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असून पोलिस प्रशासनाचा कायद्यावरील वचक पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. पर्यावरणाची हानी करणार्‍या आणि शासनाच्या नियमांना हरताळ फासणार्‍या घटकांसाठी ही कारवाई मोठा इशारा मानली जात आहे. अवैध धंदे करणार्‍यांची कोणतीही गय केली जाणार नाही. कायदा हातात घेणार्‍यांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिस प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाने मुदखेड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष कौतुक केले असून जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS