Homeताज्या बातम्या

आगामी पावसाच्या सुरुवातीला बीड शहरातील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवा; अ‍ॅड. गोविंद शिराळे यांची मागणी

बीड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील नदी-नाले साफसफाई, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि विद्युत व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी व्यापक स्वच

सावतामाळी परिसरातील स्मशानभूमी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ओसाड; स्मशान भूमी अतिक्रमणाच्या विळख्यात
हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ
बीडमधील सुभाष रोडवरील नाल्याची डॉ.सारिकाताई क्षीरसागरांकडून पाहणीतत्काळ स्वच्छता करण्याच्या बीड न.प.प्रशासनाला सूचना

बीड : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील नदी-नाले साफसफाई, पाणीपुरवठा दुरुस्ती आणि विद्युत व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नगरसेवक अ‍ॅड. गोविंद नवनाथ शिराळे यांनी केली आहे.

पुढील ८ ते १० दिवसांत शहरात मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवावी, तसेच वाढती पाणीटंचाई लक्षात घेऊन विविध भागांतील पाईपलाईन गळती (लिकेज) दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्याकडे केली. यासोबतच शहरातील बंद असलेले विद्युत दिवे, धार्मिक स्थळे, शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील विकासकामांवरही तातडीने कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. शहरात कोणताही भेदभाव न करता ग्रीन बेल्ट, ऑरेंज बेल्ट किंवा ब्लू बेल्ट अशा सर्व ठिकाणी समानतेने विकास व्हावा, असे त्यांनी नमूद केले.

या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घेत बलगुजर परिसरातील जिजाऊ नगर, तिरुपती नगर, शिवाजीनगर, स्वराज्य नगर, खोल वाट, शिराळे नगर, सावता नगर, धांडे नगर, राजमुद्रा नगर आणि सोमेश्वर नगर या भागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमात नगरसेवक गोविंद नवनाथ शिराळे, नगरसेवक नंदकिशोर पिंगळे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तातडीच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS