Homeताज्या बातम्या

परळीत एलसीबीचा धडाकेबाज छापा; २६ किलो गांजासह ७.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

परळी : बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) परळीत अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत तस्करीच्या रॅकेट

भुकेल्यांच्या ताटात माणुसकीचा घास!परळीमध्ये ग्लोबल विकास ट्रस्टच्या मोफत अन्नछत्र सेवेचा शुभारंभ
शिक्षणाच्या जोरावर मिळवले यशकु. निशिगंधा ओगलेची मंत्रालयात लिपिक पदावर निवड
घरकुल लाभार्थ्यांची थट्टा थांबवा, अन्यथा आंदोलन; महादेव गंगणे पाटील यांचा परळी पालिकेला इशारा

परळी : बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) परळीत अंमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करत तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का दिला आहे. परळी शहरातील रामनगर भागात एका घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल २६ किलो २५८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, एकूण ७ लाख ८७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मंगळवार (दि. २ जून २०२६) रोजी दुपारी सुमारे ४:३० वाजता रामनगर परिसरातील संशयित घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत राहुल राजू मोहिते (वय २६, रा. रामनगर, परळी, जि. बीड) याच्या घरातून मोठ्या प्रमाणात गांजा साठा आढळून आला. या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, गांजाचा पुरवठा नेमका कुठून होत होता तसेच यामागे असलेला मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वाखाली पो.नि. रघुनाथ नाचन, पो.उ.नि. दीपक राठोड, बालाजी दराडे व पथकाने पार पाडली. या मोठ्या कारवाईमुळे बीड जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

COMMENTS