Homeताज्या बातम्या

कारवाई की पाठराखण? नियंत्रण कक्षातून थेट वाहतूक शाखेत मारोती मुंडे यांची नियुक्ती; पोलीस दलात चर्चेला उधाण

नांदेड : राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शासकीय गणवेशात उपस्थित राहून संबंधित नेत्यांचे सार्वजनिक गुणगान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात

पूर्णा रोडवरील भरधाव कारचा थरार; दोन दुचाकींना धडक देत थेट दुकानात घुसली
नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा
हदगाव पोलीस ठाण्यात परमेश्वर कदम रुजू; कायदा व सुव्यवस्था राखण्याला देणार प्राधान्य
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रताप, काँग्रेस नेत्याच्या वाढदिवसाला खाकी वर्दीत  भाषण, तुमचा अश्वमेध... | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

नांदेड : राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात शासकीय गणवेशात उपस्थित राहून संबंधित नेत्यांचे सार्वजनिक गुणगान केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले देगलूरचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्यावरील कारवाई खरोखरच शिस्तभंगाची होती की केवळ देखावा होता, असा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेल्या मुंडे यांच्याकडे अवघ्या काही दिवसांतच नांदेड शहरातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वाहतूक शाखेचा प्रभार सोपविण्यात आल्याने पोलीस विभागात आणि राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी व्यासपीठावरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांनी नेत्याला ‘मुख्यमंत्री व्हा’ अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शासकीय गणवेशात आणि कर्तव्यावर असताना राजकीय नेत्याची स्तुती करणे हे पोलीस दलाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची टीका झाल्यानंतर मुंडे यांची तातडीने नियंत्रण कक्षात रवानगी करण्यात आली होती.

मात्र काही दिवसांतच परिस्थिती बदलली. नियंत्रण कक्षात बदली झालेल्या मुंडे यांच्याकडे अचानकपणे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली. शिस्तभंगाच्या कारवाईनंतर एखाद्या अधिकाऱ्याला इतक्या कमी कालावधीत महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळणे ही दुर्मिळ बाब असल्याचे बोलले जात असून, सामान्य कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणांसाठी कारवाई होत असताना अशा प्रकारच्या नियुक्त्यांमुळे पोलीस दलात नाराजीचा सूर उमटत आहे.

पोलीस प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर देगलूर येथे राजकीय नेत्याचे सार्वजनिक कार्यक्रमात गुणगान गाणाऱ्या मारोती मुंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई कोणाच्या मेहरबानीने किंवा शिफारशीने टळली आणि कोणाच्या शिफारशीवरून त्यांना वाहतूक शाखेचा प्रभार देण्यात आला, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. प्रामाणिकपणे कर्तव्य करणाऱ्या पोलिसांना योग्य जागी नेमणूक देण्याऐवजी शिस्तभंग करणाऱ्यांना बक्षीसी दिल्यामुळे नांदेड पोलीस विभागाचा कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे.

COMMENTS