Homeताज्या बातम्या

बीडमधील सुभाष रोडवरील नाल्याची डॉ.सारिकाताई क्षीरसागरांकडून पाहणीतत्काळ स्वच्छता करण्याच्या बीड न.प.प्रशासनाला सूचना

बीड : शहरातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असलेल्या सुभाष रोड परिसराला भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी रविवारी (दि.5) भे

अरुंद गल्ल्यांतील कचरा समस्येवर डॉ. कैलाश यादव यांचा आवाजलहान हातरिक्षांद्वारे कचरा संकलनाची मागणी
चकलांबा ग्रामपंचायतचा अवाढव्य कारभार; रत्नेश्वर महादेव मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्यमहादेव मंदिर परिसरात दुर्गंधी; ग्रामविकास अधिकारी शेंडेकर यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
गोकुंदा ग्रामपंचायतीचा ’कचरा’ कारभारउच्चशिक्षितांच्या हाती सत्तेच्या चाव्या, पण जनतेच्या नशिबी मात्र दुर्गंधीचीच माया!


बीड : शहरातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असलेल्या सुभाष रोड परिसराला भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी रविवारी (दि.5) भेट देऊन येथील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्यापार्‍यांसह नागरिकांशी संवाद साधत परिसरातील समस्यांची माहिती घेतली. मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या कामात मोठ्या नाल्याची सफाई न झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचून नाला तुंबल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना डॉ.सारिकाताई क्षीरसागर म्हणाल्या की, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बीड शहरातील सुभाष रोड ही सर्वात महत्त्वाची व्यापारी बाजारपेठ असून येथे दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. असे असतानाही परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नाल्यांची स्वच्छता न झाल्यामुळे नागरिक व व्यापार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची निविदा काढण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे या पाहणीतून झाल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली असून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून नाल्यांची स्वच्छता करून घेणार आहोत. मात्र स्वच्छतेबाबत झालेल्या दुर्लक्षाची नोंद बीडकर निश्चितच घेतील आणि सत्ताधार्‍यांना याची जाणीव करून दिली जाईल, असेही डॉ.क्षीरसागर यांनी सांगितले. यानंतर त्यांनी सहयोगनगर परिसरातील स्वच्छता कामांचीही पाहणी करून संबंधित यंत्रणेकडे आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. या पाहणी दौर्‍यात नगरसेवक शुभम धुत, नगरसेवक नितीन साखरे, नगरसेवक राहुल गुरखुदे, प्रकाश कानगावकर, शुभम कातांगळे, शारेख जकेरिया, शरद बडगे आदी उपस्थित होते.

COMMENTS