Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

‘वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ’ तातडीने कार्यान्वित करानांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री व मंत्र्यांना निवेदन

घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा! या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार राज्यभर आंदोलन सुरू असून, मुख्यम

राज्यात शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक?; विरोधी गटातील खासदारांवर मात्र लक्ष कायम
ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
शिवसेनेतील सुमार कामगिरी असणार्‍या मंत्र्यांना मिळणार डच्चू ?उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक



घोषणा झाली, आता अंमलबजावणी करा! या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या निर्देशानुसार राज्यभर आंदोलन सुरू असून, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांना तालुका व जिल्हा स्तरावर निवेदने देण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना निवेदन सादर करण्यात आले.
ऊन-पावसाची तमा न बाळगता घराघरांत वृत्तपत्र पोहोचवणार्‍या विक्रेत्यांसाठी सरकारने जाहीर केलेले ‘वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळ’ अद्याप कार्यान्वित झाले नसल्याने ते तातडीने सुरू करावे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.  यावेळी नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, दीपक तिडके यांच्यासह जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करत, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या भावना आणि हे निवेदन तातडीने शासन स्तरावर पाठवून पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदनामध्ये वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी महामंडळाचा तात्काळ शासन निर्णय (ॠठ) काढावा, असंघटित क्षेत्रातील विक्रेत्यांना पेन्शन व विमा संरक्षण लागू करावे, तसेच विक्रेत्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सवलती जाहीर कराव्यात, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या महिन्यात तातडीची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

COMMENTS