Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

गुरुद्वारा सचखंड बोर्डाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विकासकामांचे उद्घाटनडॉ. विजय सतबीरसिंघ यांची माहिती

गुरुद्वारा सचखंड बोर्ड अंतर्गत शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात विविध विकासकामांना गती देण्यात येत असून, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांनी अन

विनापरवाना आयव्हीएफ आणि गर्भलिंग केंद्र रडारवरमकोका कायद्याअंतर्गत कारवाईचा आरोग्यमंत्री आबिटकर यांचा इशारा
एकाच वैद्यकीय अधिकार्‍यावर 50 हजार नागरिकांची जबाबदारीतामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा संकटात
नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात अखेर सोनोग्राफी मशीन उपलब्धसचिन शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश



गुरुद्वारा सचखंड बोर्ड अंतर्गत शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात विविध विकासकामांना गती देण्यात येत असून, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीरसिंघ यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस रकमेत वाढ, सौर ऊर्जा प्रकल्प, ओपन जिमचे उद्घाटन तसेच भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी बक्षीस रकमेत वाढ सचखंड पब्लिक स्कूल आणि खालसा हायस्कूल येथील इयत्ता 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस रकमेतील वाढ जाहीर करण्यात आली. सौर यंत्रणा आणि ओपन जिमचे उद्घाटन श्री हजूर साहिब आयटीआय येथे नवीन सौर ऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले.  या प्रकल्पामुळे संस्था ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे. तसेच गुरुद्वारा श्री गोबिंद बाग साहिब येथे पारसेवार कुटुंबाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या ‘ओपन जिम’चे उद्घाटन करण्यात आले.  या सुविधेमुळे स्थानिक नागरिक व भाविकांना आरोग्यदायी सुविधा उपलब्ध होणार आहेत. विकासकामांचा आढावा प्रशासकांनी गुरुद्वारा शिकार घाट साहिब येथे दर्शन घेऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच गुरु साहिबांच्या घोड्यांच्या तबेल्यालाही भेट देत घोड्यांच्या आरोग्य, खाद्य व नियमित वैद्यकीय तपासणीबाबत आवश्यक निर्देश दिले. उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी विशेष व्यवस्था सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी गुरुद्वाराच्या सर्व प्रवेशद्वारांवर थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दशमेश रुग्णालय येथे बैठक घेऊन भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.

COMMENTS