Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरमध्ये श्रीराम नवमी उत्सव उत्साहात

विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलाकडून भव्य शोभायात्रा

संगमनेर ः श्रीरामनवमी निमित्ताने विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने संगमनेर शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडे,

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी ः सुस्मिता विखे
कंत्राटी कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासाठी पालिका कार्यालयासमोर कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन
नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मिसबाह शेख यांचा सन्मान

संगमनेर ः श्रीरामनवमी निमित्ताने विश्‍व हिंदू परिषद बजरंग दलाने संगमनेर शहरात भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी सनई चौघडे, पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक, भजनी मंडळ, महिलांसाठी स्वतंत्र डि.जे. व तरुणांसाठी विद्युत रोषणाई केलेला डि.जे. होता.
तामिळनाडूतल्या कोईंबतूर इथे असलेल्या शिवाच्या 112 फूट उंच भव्य आदियोगी मुर्ती प्रतिकृती व अयोध्येतील प्रतिष्ठापना केलेल्या श्रीरामलल्ला मूर्तीची 12 फूट प्रतिकृर्ती अत्यंत सुंदरपणे सजवलेली होती. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नवीन नगर रोड, बस स्थानक, छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा, पंजाबी कॉलनी, अशोक चौक, चावडी, मेनरोड, तेलीखुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक या शोभायात्रेच्या मिरवणूक मार्गावर रांगोळी व पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे जलोष्यात स्वागत केले. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. या शोभायात्रेत प्रमुख आकर्षण असलेल्या महाकाल अघोरी तांडव नृत्य प्रयोग हा जिवंत देखावा पाहण्यासाठी अबाल वृद्ध, बाल गोपाळांसह महिलांची शहर व तालुक्यातून अफाट गर्दी झाली होती. महाकाल यांचा तिरसा डोळ्या उघडल्यानंतरचे आक्रमक रूप व अघोरींचे नृत्य संगमनेरकरांनी काल पहिल्यांदा पाहिले. संगमनेर शहरातील सर्व रस्ते दुतर्फा गर्दीने भरले होते. नवीन नगर रोड येथून सुरू झालेली मिरवणूक रात्री 10 वाजेच्या दरम्यान चंद्रशेखर चौकात आली. महाआरती होवून मिरवणुकीची सांगता झाली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या संगमनेरकरांचे बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर व शुभम कपीले यांनी आभार मानले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पो.नि. भगवान मथुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS