Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मक्याची थकीत रक्कम तातडीने जमा करा; आमदार विवेक कोल्हे यांची मुख्यमंत्री अन् पणनमंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ मध्ये पणन महासंघामार्फत सुरू केलेल्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची थकीत र

कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा
संजीवनी पॉलिटेक्निकच्या १७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत नोकरी; कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यश
वादळाने झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळेंकडून पाहणी; प्रशासनाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश

कोपरगाव : महाराष्ट्र शासनाने सन २०२५-२६ मध्ये पणन महासंघामार्फत सुरू केलेल्या भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याची थकीत रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या धोरणानुसार मक्यासाठी प्रतिक्विंटल २४०० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. राज्य सहकारी पणन महासंघामार्फत ७ मार्च २०२६ पर्यंत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. मात्र, ८ मार्च ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या मक्याचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एकाच केंद्रावर ८ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत २२८ शेतकऱ्यांची तब्बल १ कोटी ६२ लाख ५६ हजार ४०० रुपयांची रक्कम प्रलंबित असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही प्रलंबित देयके तात्काळ जमा करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती विवेक कोल्हे यांनी केली आहे.

COMMENTS