Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त

छ.संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या एक दिवस अगोदर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 39 लाखाची

इम्तियाज जलील यांचे औरंगाबाद शहर नामांतराविरोधात साखळी उपोषण
किनवटच्या जंगलात वन विकास महामंडळाचा ’रक्तपात’; आदिवासींच्या हक्कावर कुर्‍हाड!आ. भीमराव केराम आक्रमक; राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून महाराष्ट्र शासनाला ’नोटीस’
फुटीचे राजकारण की नेतृत्वाचे अपयश?

छ.संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांनाच छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाच्या एक दिवस अगोदर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 39 लाखाची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. या पैशांसोबत पैसे मोजण्याचे मशीन देखील जप्त करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत अवैध रक्कम आणि दारूचा महापूर वाहत असल्याचा या निवडणुकीत दिसून आले आहे. पैठण गेट परिसरात पोलिसांनी सुमारे 39 लाख 65 हजारांची रक्कम जप्त केली आहे. एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली. या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी पैसे लपून ठेवण्यात आले होते. ही रक्कम कुणाची आहे, तसेच कोठून आणली असे दुकानदाराला विचारल्यास या बाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. पैठण गेट परिसरात मोबाईल अ‍ॅक्ससेसरीच्या दुकानात अवैध रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. तब्बल 10 दिवसांपासून पोलिस या दुकानावर पाळत ठेऊन होते. त्यानंतर या ठिकाणी धाड टाकण्यात आली. या दुकानात मोठी रक्कम आणि पैसे मोजण्याचे मशीन आढळले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कोठे नेला जात होता, याची चौकशी केली जात आहे.

COMMENTS