Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्ग विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हाती

वाशिम प्रतिनिधी ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्या

कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी
गोदावरी तीरी संत श्रेष्ठ गोरोबाकाका मंदिराचा उद्घाटन सोहळा संपन्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या ठाण्यातील नवरात्र मंडळांना भेटी

वाशिम प्रतिनिधी ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असेल, नागपूर ते शिर्डी 520 किमीचा मार्ग सुरू होईल. नागरिकांची या महामार्गामुळे मोठी सोय होईल. नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. देशातला व राज्यातला हा गेमचेंजर प्रकल्प असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला असल्याचे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या दौर्‍यातील कार्यक्रमाचाही दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. त्यानंतर शिंदे-फडणवीसांनी समृद्धी महामार्गावर प्रवास करून कामाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याचे पाहून अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर असलेल्या कारंजा टोल प्लाझा, शेलूबाजार टोल प्लाझा व मालेगाव टोल प्लाझाची पाहणी केली. तसेच शेलुबाजार ते मालेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. मालेगाव तालुक्यातील वारंगी येथील समृद्धी महामार्गावरील बेस कॅम्प येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमन प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी, विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दोनद (खुर्द) येथून सुरू होणारा समृद्धी महामार्ग मालेगाव तालुक्यातील केनवड येथून पुढे बुलढाणा जिल्ह्यात जातो. 97 किमीचा हा समृद्धी महामार्ग वाशिम जिल्ह्यातून जातो.

COMMENTS