Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी

कर्जत : शहरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडीकडे जाणारा गवंडे गल्ली परिसरातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याव

अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची गरज; चौंडीत जयंती महोत्सव उत्साहात
पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन

कर्जत : शहरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चोंडीकडे जाणारा गवंडे गल्ली परिसरातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्यावर आता कुठेही डांबर शिल्लक राहिलेले नसून सर्वत्र खड्डे व माती यामुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असून, या निमित्ताने राज्यभरातून हजारो भाविक चोंडी येथे अभिवादनासाठी येत असतात. मात्र चोंडीकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. कर्जत शहरातून जाणारा हा मार्ग कोरेगाव, चापडगाव, लोणी, दिघी, चोंडी, करमाळा यासह अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक वाढणार असल्याने अपघाताची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

“जयंतीपूर्वी रस्ता दुरुस्त झाला नाही तर भाविकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होईल,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने काम सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

“हा रस्ता खराब झाला आहे, हे खरे आहे. ३० मे पूर्वी या रस्त्याची दुरुस्ती निश्चितपणे करून दिली जाईल. त्यासाठी योग्य त्या सर्व यंत्रणांना तातडीने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” — प्रशांत वाघचौरे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

COMMENTS