Homeताज्या बातम्या

विकासाच्या शर्यतीत कर्जत-जामखेड मागे राहू देणार नाही: सभापती प्रा. राम शिंदे; योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

कर्जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसनशील भारत' हे स्वप्न पाहिले असून त्या दृष्टीने देशाची आणि राज्याची वेगाने वाटचाल सुरू आहे. या विकासप्रक्

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान
खंडगावात विजेच्या धक्क्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू; जमिनीवर पडलेल्या तारेत प्रवाह सुरू असल्याचा आरोप

कर्जत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विकसनशील भारत’ हे स्वप्न पाहिले असून त्या दृष्टीने देशाची आणि राज्याची वेगाने वाटचाल सुरू आहे. या विकासप्रक्रियेत आपला कर्जत-जामखेड मतदारसंघ कुठेही मागे राहू नये, हीच आमची भूमिका आहे. यासाठी सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना थेट जनतेच्या दारापर्यंत घेऊन जाव्यात, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

कर्तव्यपालनात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम देत, “आजच्या महत्त्वपूर्ण शिबिरात जे अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आहेत, त्यांच्या गैरहजेरीची गंभीर दखल घेऊन तत्काळ तपासणी करा,” असे कडक निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथील शारदाबाई पवार सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले होते.

प्रांत अधिकाऱ्यांचे नेटके नियोजन अन् लोकप्रतिनिधींकडून कौतुक

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) नितीन पाटील यांनी या शिबिराच्या आयोजनामागचा मुख्य हेतू स्पष्ट केला. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील घटकांपर्यंत कशा पद्धतीने प्रभावीपणे राबवल्या जात आहेत, याचा सविस्तर ताळेबंद त्यांनी मांडला. भर पावसातही प्रशासनाच्या वतीने अत्यंत सुंदर आणि नेटके नियोजन करण्यात आले होते. या उत्कृष्ट आणि यशस्वी आयोजनाबद्दल सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार सुनील कर्जतकर यांनी प्रांत अधिकारी नितीन पाटील व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे जाहीर कौतुक केले.

यावेळी बोलताना आमदार सुनील कर्जतकर म्हणाले की, “मी जामखेड तालुक्यातील आहे, मात्र आडनाव कर्जतकर आहे. त्यामुळे मला माहेरी आल्यासारखे वाटत आहे.” यावेळी त्यांनी देशातील व राज्यातील भाजप सरकारने केलेल्या विविध योजनांची व कामांची माहिती दिली. तसेच या शिबिराच्या योग्य आयोजनाबद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

या सोहळ्याला विधान परिषद सदस्य आमदार सुनील कर्जतकर, नगराध्यक्षा छाया शेलार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती काकासाहेब तापकीर, ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके, भाजपचे तालुका अध्यक्ष अनिल गदादे, जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे, बापूसाहेब नेटके यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS