Homeताज्या बातम्या

ऊसतोडा, पण पोरांच्या हातात शिक्षण द्या! वडवणीत ना. संजय राठोडांचा हुंकार; वनार्टीतून बंजारा समाजाचे भविष्य उजळवणार

बीड: जिल्ह्यातील आपला बंजारा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या संख्येने ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतो. या स्थलांतरामुळे नाईलाजाने समाजातील मुले-मुली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तख्त श्री हजूर साहिबकडून विशेष सत्कार
कोयत्याने वार करून जबरी चोरी करणार्‍या टोळीला बीड एलसीबीने ठोकल्या बेड्या; इंदापूरमधून तीन आरोपी गजाआड
वर्षभर दडपलेली फाईल अखेर उघडली; सुनील मोरे प्रकरणात मुख्याध्यापक पवळे यांच्यावर विभागीय चौकशी

बीड: जिल्ह्यातील आपला बंजारा समाज पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या संख्येने ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतो. या स्थलांतरामुळे नाईलाजाने समाजातील मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. तुम्ही स्वतः शेतात-कारखान्यात कष्ट करा, ऊसतोडणीचे काम करा; पण कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुला-मुलींच्या हातात उच्च दर्जाचे शिक्षण द्या, असा खणखणीत आणि भावूक हुंकार राज्याचे मृदा व जलसंधारण कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांनी दिला.

वडवणी येथे हरित क्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त भव्य बंजारा समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पोहरागडचे महंत जितेंद्र महाराज, उमरीगडचे महंत यशवंत महाराज यांच्यासह समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मंत्री राठोड पुढे म्हणाले, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांनी केवळ मजूर म्हणून जगायचे का? त्यांनीही प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर बनले पाहिजे. यासाठीच मी शासन स्तरावर पाठपुरावा करून वनार्टी (वसंतराव नाईक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण केंद्र) ची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून बंजारा समाजातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि रोजगारासाठी सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. या योजनेचा फायदा घेऊन आपल्या पोरांचे भविष्य उज्ज्वल करा.

तरुणांनो! कोणाच्या मागे फिरून आयुष्य वाया घालवू नका

मेळाव्यात उपस्थित असलेल्या तरुणांना संबोधित करताना मंत्री संजय राठोड यांनी अत्यंत थेट आणि रोकठोक कानमंत्र दिला. नव्या तरुणांनो, स्वतःच्या पायावर उभे राहा, उगाच बेकार बनून कोणाच्याही मागे फुकट फिरू नका. स्वतःचा वेळ आणि आयुष्य वाया घालवू नका. कामधंदे करा आणि कुटुंबाला हातभार लावा. तुम्ही शिक्षण, उद्योग, रोजगार किंवा राजकारण… ज्या क्षेत्रात काम करत असाल, तिथे प्रामाणिकपणे पुढे जा आणि वर्चस्व निर्माण करा.

काहीच जमेना तरच राजकारणात या

राजकारणातील सहभागाबद्दल बोलताना त्यांनी हसत-खेळत पण विचार करायला लावणारा टोला लगावला. ते म्हणाले, राजकारणात सक्रिय होणे गरजेचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण आधी स्वतःच्या ताकदीवर उद्योग-व्यवसाय किंवा नोकरीत स्थिर व्हा. ज्याला इतर काहीच जमले नाही, त्याने शेवटी राजकारणात यावे; आधी स्वतःचे अस्तित्व बनवा आणि मगच समाजाचे नेतृत्व करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी तरुणांना दिला.

COMMENTS