Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जलसंधारणचा गैरकारभार आणि महावितरणच्या त्रुटींविरोधात श्रीगोंद्यात उपोषण; शेतकरी संतप्त

श्रीगोंदा : तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या कथित अनियमित कारभाराविरोधात तसेच महावितरणच्या वीज व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींविरोधात सोमवारी श्रीगों

विदर्भात काँग्रेसचे ६० नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विधानपरिषद निवडणुकीसाठी आत्तापासूनच तटबंदी सुरू
परळीत तोहिद खान कुटुंबीयांची वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्याकडून सांत्वनपर भेट; एक लाखांची मदत जाहीर
नवे शैक्षणिक वर्ष; शाळा प्रवेशोत्सवासाठी नांदेड जिल्हा प्रशासन सज्ज, पहिल्याच दिवशी अधिकारी शाळांना देणार भेटी

श्रीगोंदा : तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या कथित अनियमित कारभाराविरोधात तसेच महावितरणच्या वीज व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींविरोधात सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी केले. आढळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियमित गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बंधारे दुरुस्ती, “पाणी अडवा-पाणी जिरवा” यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना नाहक हेलपाटे मारावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला.

दुसरीकडे, महावितरणच्या कारभारावरही जोरदार टीका करण्यात आली. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तांदळी दुमाला सबस्टेशनवरील वाढता ताण, आढळगाव परिसरात स्वतंत्र सबस्टेशन मंजूर करणे आणि अतिरिक्त लाईनमनची नेमणूक करणे आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यापूर्वी अनेकदा निवेदने देऊनही दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे अनिल ठवाळ यांनी स्पष्ट केले. तहसीलदार सचिन डोंगरे व महावितरणचे अधिकारी इंदलकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले.

“जनता दरबार प्रशासकीय कार्यालयातच घ्यावा” उपोषणस्थळी बोलताना राजेंद्र म्हस्के यांनी आमदारांच्या जनता दरबाराच्या आयोजनावर भूमिका मांडली. “जनता दरबार हा खासगी अथवा पक्षीय कार्यालयात न घेता प्रशासकीय कार्यालयातच आयोजित करावा. तसेच तो सोमवारी घेऊ नये, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांची शासकीय कामे अडथळ्याविना होतील,” अशी मागणी त्यांनी केली.

COMMENTS