Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या; राजकीय युद्ध पेटण्याची शक्यता!

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा खेळ सुरू झाला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक

नंदीग्राममधील विजयानंतर सुवेंदू अधिकारी यांचे वादग्रस्त विधान
कोलकात्यात जिल्हा परिषद भवनाला लागलेल्या भीषण आगीत ४,००० ईव्हीएम जळून खाक
कोलकात्यात मतदानापूर्वी ‘ईडी’चा धडाका; दोन मोठ्या व्यावसायिकांच्या ठिकाणांवर पहाटेच छापेमारी!
Suvendu Adhikari's PS shot dead days after Bengal win

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा रक्ताचा खेळ सुरू झाला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक चंद्रनाथ रथ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात गाडी अडवून झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे.
ही घटना घडली उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम येथे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चंद्रनाथ रथ आपल्या स्कॉर्पिओ गाडीने घरी परतत होते. कोलकातापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर, एका अज्ञात कारने त्यांचा रस्ता अडवला आणि दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी स्कॉर्पिओच्या डाव्या बाजूने ६ ते १० गोळ्या झाडल्या.
या भीषण हल्ल्यात ४२ वर्षीय चंद्रनाथ यांना चार गोळ्या लागल्या, ज्यातील दोन छातीत आणि एक पोटात घुसली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात त्यांचा चालक बुद्धदेव बेरा हा देखील जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
शुभेंदू अधिकारी यांनी ही ‘टार्गेट किलिंग’ असल्याचे म्हटले असून, गेल्या २-३ दिवसांपासून त्यांची रेकी केली जात असल्याचा दावा केला आहे. भाजपने थेट तृणमूल काँग्रेसवर (TMC) या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके तयार केली असून हल्लेखोरांनी वापरलेली गाडी जप्त केली आहे. धक्कादायक म्हणजे या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले आहे.
“माझ्या मुलाचा अपघात झाला असता तर दुःख झाले नसते, पण त्याचा छळ करून खून करण्यात आला,” असा आक्रोश चंद्रनाथ यांच्या आईने केला आहे. त्यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, भाजप आता आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.
व्यावसायिक शूटर्सचा वापर आणि बनावट नंबर प्लेट, यावरून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होत आहे. आता पोलीस यामागचा खरा सूत्रधार शोधून काढतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

COMMENTS