Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा प्रश्नी महाराष्ट्र पेटला! संतप्त शेतकऱ्यांचा मुंबई-आग्रा हायवेवर ‘रास्ता रोको’; नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘क्रांती महामोर्चा’

नाशिक : कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाविकास आघाडी (मविआ) आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या 'क्रांती मह

पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचा बळी दिला; ॲड. प्रकाश आंबेडकरांची कडाडून टीका
विषारी दारूमुळे मृतांची संख्या २२ वर; गावरान दारूमध्ये ‘मिथेनॉल’ मिसळल्याने अनेकांचा मृत्यू
महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजय निश्चित असल्याचा अशोकराव चव्हाण यांचा दावा
गळ्यात कांद्याच्या माळा… सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी… कांद्याच्या  दरवाढीसाठी महाविकास...

नाशिक : कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आणि महाविकास आघाडी (मविआ) आक्रमक झाली आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या ‘क्रांती महामोर्चा’मुळे प्रचंड खळबळ उडाली असून संतप्त आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. चांदवड परिसरात या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. या महामोर्चात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह मविआचे हजारो कार्यकर्ते गळ्यात कांद्याची माळ घालून रस्त्यावर उतरले आहेत.

या मोर्चातून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “१८ तारखेला मुख्यमंत्र्यांनी २४ रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात आता १२ रुपये दिले जात आहेत. नाफेडकडून होणाऱ्या खरेदीत मोठा घोळ असून केवळ २ लाख टन खरेदीने काही होणार नाही. शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यावे आणि परराज्यातही कांदा विकण्याची परवानगी द्यावी.”

दुसरीकडे, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप केला. “सरकारने १२ रुपये दर जाहीर करून १०-१२ दिवस झाले, पण एका तरी शेतकऱ्याचा कांदा या दराने खरेदी केला का? सरकारने तशी एखादी पावती तरी दाखवावी!” असे थेट आव्हान दानवे यांनी सरकारला दिले.

बिथरलेली बैलगाडी आणि रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी: या आंदोलनादरम्यान एक नाट्यमय प्रकार पाहायला मिळाला. आंदोलनातील एक बैलगाडी अचानक बिथरल्याने त्यावर स्वार असलेले रोहित पवार, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने खाली उतरावे लागले. त्यांनी पायीच हा मोर्चा पुढे नेला. यावर मिश्किल टिप्पणी करताना रोहित पवार म्हणाले की, “बैल सुद्धा सरकारला जाऊन धडकायला निघाला होता, जर सरकार समोर आले असते तर नक्कीच धडकले असते!”

COMMENTS