Homeताज्या बातम्या

साकत घाटात भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; २० जण जखमी, चौघे गंभीर

जामखेड : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सला साकत घाटात भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र वळण

वादळाने झालेल्या नुकसानीची आमदार आशुतोष काळेंकडून पाहणी; प्रशासनाला तातडीने पंचनाम्यांचे आदेश
संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकल्प वर्षा’ पुन्हा सुरू करा; सुधीर भद्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
तहसील कार्यालयासमोर कांदे ओतून आंदोलन; अकोलेत किसान सभेची जोरदार निदर्शने

जामखेड : मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून धार्मिक यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सला साकत घाटात भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने मिनी ट्रॅव्हल्स संरक्षक कठड्यासह दिशादर्शक फलकाला धडक देऊन थेट खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून, सुमारे २० भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला.

बऱ्हाणपूर येथील सुमारे २२ भाविक मिनी ट्रॅव्हल्स भाड्याने घेऊन मुक्ताईनगर, शेगाव, औंढा नागनाथ, तुळजापूर येथे दर्शन उरकून जेजुरी आणि पुण्याच्या दिशेने निघाले होते. साकत घाटातून प्रवास सुरू असताना चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट संरक्षक कठडा तोडून खाली खड्ड्यात कोसळली.

अपघातानंतर रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन व चालक गौरव महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले, तर महिलांना पुढील उपचारासाठी पुण्यात पाठविण्यात आले आहे. जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या धोकादायक घाटरस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS