Homeताज्या बातम्या

योगा डे च्या पूर्व संध्येला माईलस्टोनच्या 150 विद्यार्थ्यांची मानवी साखळी700 विद्यार्थ्यांनी अनुभवले योगविज्ञानाचे धडे; बीडमध्ये अनोखा उपक्रम

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. योग दिनाच्या पूर्वसंध्य

योग दिनानिमित्त पाच दिवस मोफत ऑनलाइन योग वेबिनारचे आयोजनसहभागी होण्याचे राधा तांबे यांचे आवाहन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातून साधला संवाद, देशभरात हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत अवतरली योगाची ऊर्जा!
योगा दिनानिमित्ताने १५१ सूर्यनमस्कारांचा संकल्प यशस्वी  

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. योग दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शाळेतील तब्बल 700 विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होत योगासनांचे प्रात्यक्षिक केले.यावेळी इयत्ता तिसरी-चौथीच्या 150 विद्यार्थ्यांची योगा डे ’मानवी साखळी’ करून उपस्थितांचे लक्षवेधले.
शनिवारी सकाळी 9 वाजता विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाला उत्साही वातावरणात सुरुवात झाली. आधुनिक जीवनशैलीत योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असून, शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना याची गोडी लागावी या उद्देशाने माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शंकर पवळ, सचिव ज्ञानेश्वर तांबे, उपाध्यक्ष नम्रता भानुसे आणि मुख्याध्यापिका सारिका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरीत्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख योग मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले अशोक चौरे आणि कृष्णा भोर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शास्त्रोक्त धडे दिले. त्यांनी केवळ आसने करून घेतली नाहीत, तर प्रत्येक आसनाचा शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो, हे अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून एकाग्रता कशी वाढवावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतले. योग ही केवळ एक शारीरिक कसरत नसून ती जीवन जगण्याची कला आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात मानसिक शांतता आणि शारीरिक सुदृढतेसाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन विद्यालयाच्या प्राचार्य सारिका जगताप यांनी करत विद्यार्थांना मार्गदर्शन केले.विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शाळेच्या क्रीडा गणवेशात आलेल्या विद्यार्थ्यांनी विविध योगासने करत उपस्थितांची मने जिंकली.
तिसरी-चौथीच्या 150 विद्यार्थ्यांची ’मानवी साखळी’
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शाळेतील लहान चिमुरड्यांनी तयार केलेली मानवी साखळी! इयत्ता तिसरी आणि चौथीच्या तब्बल 150 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मैदानावर एक शिस्तबद्ध आणि लक्षवेधी मानवी साखळी तयार केली. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून चिमुरड्यांनी बीडकरांना ’योग करा, निरोगी राहा’ असा महत्त्वपूर्ण संदेश दिला. या साखळीचे पालकांकडून आणि शिक्षकांकडून कौतुक होत आहे.

COMMENTS