Homeताज्या बातम्या

किनवटमध्ये भाजपच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात; एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिर संपन्नकिनवट

 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी किनवट शहर मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 21) एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी कोलकात्यातून साधला संवाद, देशभरात हिमालयापासून ते हिंद महासागरापर्यंत अवतरली योगाची ऊर्जा!
योगामुळे आत्मिक उन्नती होते : गोसावी
कृषीक्रांती गृहनिर्माण सोसायटीमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरानिरोगी जीवनशैलीचा संदेश देत शेकडो योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग


 जागतिक योग दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी किनवट शहर मंडळाच्या वतीने रविवारी (दि. 21) एन. के. गार्डन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगासनांचा सराव केला.
आ. भिमराव केराम यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आणि नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजप शहर मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनीवार यांनी या शिबिराचे अत्यंत नेटके व यशस्वी आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्राचार्य आनंद सरतापे यांनी योगाचे मानवी जीवनातील आणि आरोग्यातील महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. रोजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योग साधना करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. या शिबिराला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये  शिवराज रघुमामा, शिबिर संयोजक विश्वास कोल्हारीकर, राजेंद्र भातनासे. शहर सरचिटणीस बाळकृष्ण कदम, सागर पिसारीवार, जयराज वर्मा. विनोद मुंडे, कृष्णा पाटील, जगदिश तिरमनवार, नरसिंग तक्कलवार, राहुल दग्गुलवार. नगरसेवक संतोष मरसकोल्हे, कृष्णा कलकुटलवार, अक्षय पावडे आणि राम शेपुरवार. यांच्यासह अनेक मान्यवर, महिला व नागरिक निरोगी आरोग्याचा संकल्प करत या शिबिरात सहभागी झाले होते.

COMMENTS