Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी तरुण सुनिल कडाळे बनला कृषिमंडळ अधिकारी

अकोले /प्रतिनिधीः अकोले तालुक्यातील सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगराळ व आदिवासी बहुल भागातील तरुण सुनिल संजय कडाळे याने आपल्या अपार मेहनतीने,

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह
झाडावरच्या बोरांच्या आमीषाने मुलाला गमवावा लागला प्राण…
Ahmednagar : जामीनावर असलेल्या आरोपीला गावठी कटयासह रंगेहात पकडले | LOKNews24

अकोले /प्रतिनिधीः अकोले तालुक्यातील सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगराळ व आदिवासी बहुल भागातील तरुण सुनिल संजय कडाळे याने आपल्या अपार मेहनतीने, जिद्दीने, अनेक  अडथळ्यांना पार करत वर्ग-2 चे कृषि मंडळ अधिकारी पद मिळवत आपल्या पिंपळदरी-चास गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
  या यशाबद्दल चास ग्रामपंचायत व ग्रामस्थ, भैरवनाथ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा चास यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य भागवत वाडेकर होते.याप्रसंगी चासचे उपसरपंच सचिन शेळके,भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुनिल चौधरी,सुनील कडाळे याचे आजोबा बजरंग कडाळे,वडील संजय कडाळे,भाऊ अजय कडाळे, सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे, संपतराव पवार,गणेश शेळके,निवृत्ती पवार,प्राथमिक शिक्षक विजय दुरगुडे, भास्कर तुरनर,रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल वैद्य प्रा. संदिप नवले,प्राध्यापक शिवाजी खुळे,प्राध्यापिका मनिषा शेटे,यांचेसह रोहिदास शेळके,भारत  शेळके,आर.के.दुरगुडे,सुदर्शन आळणे,रामनाथ शेळके,पंढरीनाथ मेंगाळ आदी ग्रामस्थ ,विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.यावेळी बोलताना उपसरपंच सचिन शेळके यांनी गरीब कुटुंबातील मुलगा स्पर्धा परीक्षेतून एवढ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो. ही आपल्या   गावासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. व तरुणांनी ही गोष्ट लक्षात घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी  शालेय जीवनापासूनच करावी व आपले धेय्य निश्‍चित करावे असे आवाहन केले.
 सत्कारमूर्ती नवनियुक्त कृषी मंडळ अधिकारी सुनिल कडाळे यांनी मुलांना सात बाराचा अभ्यास केला.तर तुम्ही नक्कीच स्पर्धा परीक्षा पास झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. अभ्यासाचे सात बारा चे सूत्र म्हणजे सकाळी 7 ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत कसून अभ्यास करणे असे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या या यशात माझे आजोबा बजरंग भाऊ कडाळे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याच बरोबर आई-वडील, व मला शिकवणारे माझ्या पिंपळदरी गावातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांनी मला योग्य संस्कार,दिशा दिली. म्हणून मी आज या ठिकाणी  उभा आहे.पुढे या यशावरच न थांबता वर्ग अभ्यासाने वर्ग-1 चे  फॉरेस्ट ऑफिसर पद मिळवण्याची इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जेष्ठ शिक्षक भारत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक शिवराम भोर यांनी करत शेवटी मान्यवरांचे आभार मानले.

COMMENTS