Homeताज्या बातम्या

घोडका (राजुरी) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीडच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता घोडका (राजुरी) येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्या

आ. आनंदराव बोंढारकर यांची ज्येष्ठ नागरिकांना ग्वाही; अधिवेशनात प्रश्न मांडून न्याय मिळवून देणार
ज्येष्ठांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : पो.नि.गायकवाड
वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांच्या वतीने दि. 20 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता घोडका (राजुरी) येथे कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. दिनेश पी. सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीडचे सचिव डॉ. वहाब अ. सय्यद यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.
या कार्यक्रमाला घोडका राजुरीच्या सरपंच बारकाबाई घोडके, ग्रामविकास अधिकारी नागरगोजे, सचिन घोडके, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, मिथुन जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामध्ये सचिव डॉ. वहाब अ. सय्यद यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहिती देत नागरिकांना मोफत विधी सहाय्य, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध कायदेशीर हक्क, वृद्धांचे अधिकार, पोक्सो कायदा, ऑनलाइन फसवणूक, मनोधैर्य योजना, मध्यस्थीद्वारे तडजोड यासह विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अशोक तांगडे यांनी आपल्या अनुभवांच्या माध्यमातून उपस्थित ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच तत्त्वशील कांबळे यांनी शासन व राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती दिली. नशामुक्त भारत अभियानांतर्गत अमली पदार्थांचे सेवन शरीरासाठी किती घातक आहे, याबाबत त्यांनी जनजागृती केली. गावात एकही बालविवाह होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे. तसेच बालविवाह होत असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांना टोल फ्री क्रमांक 15100 वर तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विधी महाविद्यालयाचे पॅरा लीगल व्हॉलंटिअर्स (पीएलव्ही) अभिषेक औताडे व शफे मोमीन यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीची माहिती देत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत विधी सहाय्य मिळविण्याची प्रक्रिया व नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांविषयी मार्गदर्शन केले. शिबिराला ग्रामस्थ, महिला, ज्येष्ठ नागरिक व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संविधान साठी पंचशीला धिमधीमे, ज्योती थोरात, साधना वाघमारे, प्रेमानंद मोरे आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीडचे कर्मचारी ओंकार नाईकवाडे, मिथुन जोगदंड, महादेव गायके व अर्जुन काळे यांनी सहकार्य केले.

COMMENTS