खडकावर आदळून बोटीला लागली आग रेवस बंदरात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

खडकावर आदळून बोटीला लागली आग रेवस बंदरात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

फिलीफाईन्स च्या पाच कर्मचाऱ्यांना जीव थोडक्यात वाचला बोटीची टेस्टिंग करताना घडला अपघात

 तटरक्षक दलाने  केलेल्या कामगिरीमुळे वादळाच्या तडाख्यात अडकलेल्या बोटीतून पाच जणांनी सुखरुप सुटका करण्यात आली. रेवस बंदरात(Port of Revus) थरारक रेस्क

शेअर बाजार कोसळला
देशाला महात्मा गांधी,विनोबा भावे व निर्मला देशपांडे यांचे कार्य व विचार मार्गदर्शक आहेत-डॉ. कैलास दौंड
पाथर्डी तालुक्यात पावसाचा हाहाःकार

 तटरक्षक दलाने  केलेल्या कामगिरीमुळे वादळाच्या तडाख्यात अडकलेल्या बोटीतून पाच जणांनी सुखरुप सुटका करण्यात आली. रेवस बंदरात(Port of Revus) थरारक रेस्क्यू ऑपरेशन मुळे फिलीफाईन्स(Philippines) च्या पाच कर्मचाऱ्यांना जीव थोडक्यात वाचला आहे.रेवस बंदरात एक बोट खडकावर आदळली आणि त्यानंतर या बोटीला आग लागली होती. बोटीतील आगीची माहिती तटरक्षक दलाला(Coast Guard) देण्यात आली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलाचे(fire brigade) जवान, पोलीस(Police) आणि सीआयएसएफच्या पथकाने(CISF squads) बचावकार्य करण्यासाठी धाव घेतली. अखेर आग लागलेल्या या बोटीमधील पाच कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून लिफ्ट करण्यात आलं. त्यामुळे या बोटीवरील सर्वांचा जीव थोडक्यात वाचला असून ही बोट मूळची दुबई(Dubai) तील असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईहून कोचीन,(Cochin) मालदिव(Maldives) मार्गे मुंबईत(Mumbai) ही बोट आली होती. सोलरवर चालणाऱ्या या बोटीची टेस्टिंग केली जात असताना त्या दरम्यान, हा अपघात घडला.

COMMENTS