कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व स्पर्धा परिक्षांद्वारे विविध पदांना गवसणी घालणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, कला विभागप्रमुख प्रा. दौलत जाधव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा. गणेश जेजुरकर यांनी केले. याप्रसंगी प्रा. अभिजीत वाघ यांचे भाषण झाले. बीड पोलीस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाची विद्यार्थिनी मेघा वाघमारे, सी. एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अस्मिता देवकर आणि सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या विद्यार्थिनींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयाचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाणगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात जिद्द, चिकाटी ठेवावी तसेच आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. यश नक्कीच आपल्याला मिळेल. आत्मविश्वासाने स्पर्धांना सामोरे जाणे आणि पुस्तकं वाचणे ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी भोसले व प्रा. सायली वायखिंडे यांनी केले, तर आभार प्रा. ज्योती लोंगाणी यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

कोपरगाव : के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथे नुकताच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व स्पर्धा परिक्षांद्वारे विविध पदांना गवसणी घालणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे हे होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे, कला विभागप्रमुख प्रा. दौलत जाधव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख प्रा. गणेश जेजुरकर यांनी केले. याप्रसंगी प्रा. अभिजीत वाघ यांचे भाषण झाले. बीड पोलीस दलात निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाची विद्यार्थिनी मेघा वाघमारे, सी. एस. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल अस्मिता देवकर आणि सी. ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल ज्ञानेश्वरी पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी या विद्यार्थिनींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयाचे आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाणगे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आयुष्यात जिद्द, चिकाटी ठेवावी तसेच आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा. यश नक्कीच आपल्याला मिळेल. आत्मविश्वासाने स्पर्धांना सामोरे जाणे आणि पुस्तकं वाचणे ही आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी भोसले व प्रा. सायली वायखिंडे यांनी केले, तर आभार प्रा. ज्योती लोंगाणी यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.


COMMENTS