कोपरगाव (स्थानिक) : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागा

कोपरगाव (स्थानिक) : कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागात ‘प्राण्यांची उत्क्रांती’ या विषयावरील अतिथी व्याख्यान १८ मार्च रोजी उत्साहात पार पडले.
या व्याख्यानासाठी एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथील प्राणीशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका अंकिता प्रसाद या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन करताना विशेषतः अपृष्ठवंशीय प्राणी, त्यांचे विविध गट, वर्गीकरण तसेच पर्यावरणातील त्यांचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती विकसित करून आजूबाजूच्या जैवविविधतेविषयी अधिक माहिती घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य प्रा. विजय ठाणगे तसेच प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर. डी. गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शिंदे, प्रा. भडांगे, प्रा. मोरे, प्रा. खाडे, प्रा. कोकाटे, प्रा. धांडे यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रयोगशाळा परिचर नितीन कुलकर्णी यांनी सहकार्य केले. प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

COMMENTS