Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. पिपाडा यांनी घेतली गृहमंत्री शहा यांची भेट

राहाता : गृहमंत्री अमित शहा यांची भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये

श्री अंबाबाई मंदिराच्या 1446 कोटींच्या विकास कामास सुरूवातकेंद्रीय गृहमंत्री शाह व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ
नारीशक्तीचा नवा अध्याय !
वित्तीयसंस्थाच्या मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देणार: फडणवीसांचे निर्देशखा.बजरंग सोनवणेंनी विधानभवनातील बैठकीत मांडली ठेवीदारांची व्यथा; विशेष न्यायालयाचीही मागणी

राहाता : गृहमंत्री अमित शहा यांची भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली असून, राजकीय वर्तुळात या भेटीकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जात आहे.

 राज्याच्या राजकारणात सक्रिय असणारे भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी नुकतीच देशाची राजधानी गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या प्रसंगी डॉ. पिपाडा यांनी अमित शहा यांना बजरंगबलीची मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार केला. ही भेट केवळ सदिच्छा असली, तरी आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

यावेळी डॉ. पिपाडा यांच्या समवेत त्यांच्या कन्या ट्रिकल पिपाडा या देखील उपस्थित होत्या. दिल्लीच्या या दौऱ्यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चे चा विषय ठरत आहेत.

COMMENTS