Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यक्ती बेपत्ता; शोधासाठी बेलवंडी पोलिसांचे आवाहन

श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून संबंधिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव दत्तात्रय घेगडे (वय ३०) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा कायम पत्ता सोमवार पेठ, पुणे (महावीर लॉजजवळ) असा असून सध्या ते देवदैठण (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे वास्तव्यास होते. ५ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बेपत्ता व्यक्तीची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून सडपातळ बांधा, गोरा रंग व लांबट चेहरा आहे. डाव्या पायाच्या पंजावर जखमेचा व्रण असून दाढी-खुरट व डोक्यावर केस वाढलेले आहेत. अंगात लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट होती. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा अद्यापपर्यंत कोणताही मागोवा लागलेला नसून बेलवंडी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास बेलवंडी पोलीस स्टेशन किंवा संपर्क क्रमांक ९८९०३२७०७२ (स.पो.नि. सोनवलकर) तसेच ०२४८७-२५०२३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अवघ्या सहाव्या वर्षी ‘केदारकंठ’ सर ! अकोलेच्या मणिकर्णिकाचा राष्ट्रीय विक्रम; जिद्दीने हिमालयालाही गवसणी
दुर्गादेवी नय्यर विद्यालयात गुणगौरव सोहळा उत्साहात; मंथन व स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी
अशोक खरातकडून कोल्ड रिडिंग-हॉट रिडिंग कोडचा वापर; एसटायटीच्या तपासात भोंदूगिरीचे अनेक प्रताप समोर

श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीतून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून संबंधिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव दत्तात्रय घेगडे (वय ३०) असे बेपत्ता व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा कायम पत्ता सोमवार पेठ, पुणे (महावीर लॉजजवळ) असा असून सध्या ते देवदैठण (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे वास्तव्यास होते.

५ नोव्हेंबर २०१२ रोजी सकाळी सुमारे ९ वाजता ते घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतरही काहीच माहिती न मिळाल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

बेपत्ता व्यक्तीची उंची अंदाजे ५ फूट ६ इंच असून सडपातळ बांधा, गोरा रंग व लांबट चेहरा आहे. डाव्या पायाच्या पंजावर जखमेचा व्रण असून दाढी-खुरट व डोक्यावर केस वाढलेले आहेत. अंगात लाल रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट होती.

दरम्यान, संबंधित व्यक्तीचा अद्यापपर्यंत कोणताही मागोवा लागलेला नसून बेलवंडी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या व्यक्तीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास बेलवंडी पोलीस स्टेशन किंवा संपर्क क्रमांक ९८९०३२७०७२ (स.पो.नि. सोनवलकर) तसेच ०२४८७-२५०२३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS