Homeताज्या बातम्याबीड

भावाच्या जमिनीवर ताबा सांगणार्‍या बहिणींचा मनाई हुकूम अर्ज न्यायालयाकडून खारीजअ‍ॅड.गणेश एम. कोल्हे यांचा युक्तीवाद ठरला निर्णायक

तालुक्यातील मानकुरवाडी येथील गट क्रमांक 274 मधील वादग्रस्त वडिलोपार्जित जमिनीप्रकरणी विवाहित बहिणींनी ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी दाखल केलेला मन

आनंदगाव बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: माजलगाव न्यायालयाकडून आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
बिंदुसरा नदीपात्र, ओपन स्पेस व व्यापारी संकुल अतिक्रमणप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेगोरगरिबांवर कारवाई अन् भू-माफियांना अभय का?- डॉ. गणेश ढवळे
कुख्यात गुंड शेख कलीमची हर्सल कारागृहात रवानगी; एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई



तालुक्यातील मानकुरवाडी येथील गट क्रमांक 274 मधील वादग्रस्त वडिलोपार्जित जमिनीप्रकरणी विवाहित बहिणींनी ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी दाखल केलेला मनाई हुकूम अर्ज न्यायालयाने खारीज केला आहे. सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर), बीड यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.
या प्रकरणात प्रतिवादी भावंडांच्या वतीने अ‍ॅड. गणेश एम. कोल्हे यांनी न्यायालयात बाजू मांडत भक्कम युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद व सादर करण्यात आलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मानकुरवाडी ता. वडवणी, जि. बीड येथील गट क्रमांक 274 मधील जमिनीबाबत वादी लताबाई उमाजी जगताप व वृंदावनी परमेश्वर भुसारे या दोन सख्ख्या बहिणींनी त्यांचे वडील पांडुरंग देवराव जाधव तसेच भाऊ जगन्नाथ, ईश्वर व शरद पांडुरंग जाधव (रा. मानकुरवाडी, ता. वडवणी, जि. बीड) यांच्याविरोधात ताबा व वहिवाटीच्या मागणीसाठी मनाई हुकूम अर्ज दाखल केला होता. सदर अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने 6 एप्रिल 2026 रोजी गुणवत्तेच्या आधारे निष्कर्ष नोंदवत अर्ज खारीज केला. प्रतिवादींच्या वतीने अ‍ॅड. गणेश एम. कोल्हे यांनी मनाई हुकूम अर्जाविरोधात पुराव्यासह सविस्तर युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने वादींची मागणी फेटाळून लावत अर्ज खारीज केला आणि प्रतिवादींच्या बाजूने निर्णय दिला.

COMMENTS