Homeताज्या बातम्या

  “धोक्याच्या छायेतून सुरक्षित भविष्याकडे; कपिलधारवाडी पुनर्वसनासाठी १८ कोटींचा दिलासा”आ. विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांकडून आभार, पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा

बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळा

29 जूनच्या ‘शेतकरी एल्गार’मधून सरकारला गुडघ्यावर बसवू; रोहित पवारांचा इशाराकर्जमाफी, पीकविमा, विकास अनुशेष, नीट गैरव्यवहारासह विविध मुद्द्यांवर सरकारवर हल्लाबोल
कर्जमाफीत सरकारने शेतकर्‍यांना फसवले-राजेंद्र आमटेशेतकरी हक्क मोर्चाने  नागपूर (खुर्द )येथे केली जीआरची होळी
मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीतहवामान विभागाचा आज पावसाचा रेड अलर्ट ; प्रशासन सतर्क


बीड : अतिवृष्टी आणि भूस्खलनाच्या सततच्या धोक्यामुळे अनेक वर्षांपासून असुरक्षित जीवन जगणाऱ्या कपिलधारवाडी येथील ग्रामस्थांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी तब्बल १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामागे आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
कपिलधारवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे दरवर्षी भूस्खलनाचा धोका निर्माण होत असल्याने ग्रामस्थांच्या जीवित आणि मालमत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेक वर्षांपासून या गावाच्या पुनर्वसनाचा विषय शासनदरबारी प्रलंबित होता. गावकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मागण्यांची दखल घेत आमदार विजयसिंह राजे पंडित यांनी हा प्रश्न सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला. विविध स्तरांवर पाठपुरावा करत पुनर्वसनाची गरज अधोरेखित केली.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत पुनर्वसन विभागाकडून गावाच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याच्या नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
निर्णयाबद्दल कपिलधारवाडी ग्रामस्थांनी आमदार विजयसिंह राजे पंडित यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच मंजूर झालेला निधी लवकरात लवकर खर्च करून पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी आणि प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित व सर्व सोयीसुविधांनी युक्त निवास उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्याला यश
कपिलधारवाडी पुनर्वसनाचा प्रश्न केवळ विकासाचा नव्हे, तर ग्रामस्थांच्या जीवित सुरक्षिततेचा होता. शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आता सुरक्षित निवास, मूलभूत सुविधा आणि भविष्यातील आपत्तीचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. मात्र, निधी मंजुरीनंतर प्रत्यक्ष पुनर्वसनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होणे आणि प्रत्येक बाधित कुटुंबाला न्याय मिळणे, हेच आता ग्रामस्थांच्या अपेक्षेचे केंद्रबिंदू ठरणार आहे. “कपिलधारवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा आमच्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रश्नासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला असून, ग्रामस्थांच्या न्याय्य हक्कासाठी कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. यापुढेही पुनर्वसनाशी संबंधित सर्व प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत ग्रामपंचायत व प्रशासनाच्या समन्वयाने आवश्यक तो पाठपुरावा आणि प्रयत्न सुरूच राहतील.”
— राणे गणेश नवले
सरपंच, ग्रामपंचायत पाली कपिलधारवाडीच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूरअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला मिळाला मार्ग
 आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
 भूस्खलनाच्या धोक्यातून ग्रामस्थांना सुरक्षित जीवनाची आशा
 पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी

COMMENTS