Homeबीड

तोहिद खान हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या-सादिक इनामदार

बीड : परळी येथील तोहिद खान या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी इंजिनिअर सादिक इ

गाईला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित कराकत्तलखाने व मांस निर्यात बंदीच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
फेसबुक पोस्ट प्रकरणात कफील खान यांची निर्दोष मुक्तताअ‍ॅड. इमरान खाजा यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे खटल्याचा निकाल आरोपीच्या बाजूने


बीड : परळी येथील तोहिद खान या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी इंजिनिअर सादिक इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तोहिद खान यांची हत्या ही अत्यंत गंभीर आणि समाजमनाला हादरवून सोडणारी घटना असून या प्रकरणाचा केवळ खुनाचा गुन्हा म्हणून विचार न करता त्यामागील सर्व पैलूंचा सखोल तपास करण्यात यावा. घटनेनंतर समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी करून त्यातील तथ्य समोर आणावे. तसेच आरोपींची पार्श्वभूमी, त्यांचे संपर्क, पूर्वीचे गुन्हे आणि समाजात द्वेष निर्माण करणार्‍या प्रवृत्तींशी असलेले संबंध तपासण्यात यावेत. या प्रकरणामुळे अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तपासादरम्यान समोर येणार्‍या पुराव्यांच्या आधारे आवश्यक असल्यास यूएपीए व मकोका सारख्या कठोर कायद्यांअंतर्गत कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्य शासनाने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे आणि पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळवून द्यावा. तसेच या प्रकरणातील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी इंजिनिअर सादिक इनामदार यांनी केली आहे.

COMMENTS