शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले

प्रतिनिधी : सोनई जागतिक स्तरावरील नावलौकिक असलेल्या श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी म्हणून जी.के.दरंद

शाडू मातीच्या पर्यावरणपुरक श्रीगणेशाचे चौकात बनविलेल्या कुंडात विसर्जन
नगरकरांचं टेन्शन वाढलं , हा तालुका पुन्हा कोरोना हॉटस्पॉट वर ! l Ahmednagar l LokNews24 l
विद्यार्थी प्रगत तर राष्ट्र प्रगत: महापौर रोहिणी ताई शेंडगे

प्रतिनिधी : सोनई

जागतिक स्तरावरील नावलौकिक असलेल्या श्री.क्षेत्र शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी म्हणून जी.के.दरंदले यांची तर उप कार्यकारी अधिकारी म्हणून तांत्रिक विभागाचे नितीन शेटे यांची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष भागवत बानकर यांनी दिली.

        देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांच्या अध्यक्षतेखाली  विश्वस्त मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बऱ्याच महिन्यापासून रिक्त असलेल्या दोन्ही पदासाठी मुलाखती घेऊन जी.के.दरदले यांची मुख्य कार्यकारी अधिकारी तर नितीन शेटे यांची उपकार्यकारी पदी निवड झाल्याचे घोषित केले.

       दरदले यांनी २४ वर्षात सेवेत राहून त्यांनी सहा वर्षांहून अधिक काळ सहायक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.शेटे यांनीही सहा वर्षे तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या नूतन अधिकाऱ्यांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला.

मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली शनी भाविक भक्तांना सुविधा उपलब्ध करून तो पुरवण्याचा प्रयत्न राहणार

जी.के.दरंदले,नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी, शनिशिंगणापूर, देवस्थान.

COMMENTS