Homeताज्या बातम्या

कुंडलवाडीत मोकाट कुत्रे व डुकरांचा वाढता उपद्रव ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शहरात सध्या मोकाट कुत्रे व डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत मोकाट क

मुखेडच्या मुख्याध्यापकाला 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेबदली करून देणे, नोटीस न देणे आणि ‘हप्ता’ प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई
चिखलीकरांची तलवार म्यान, अशोकनीतीमुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!गरजणारे बरसले नाहीत, लपून छपून वार करणार्‍यांचे शहरातून पलायन, राजुरकरांच्या वाटेवर काटे पेरणारे तोंडावर आपटले
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएत विलय होणार? मुख्यमंत्र्यांनी चर्चा फेटाळून लावली!

शहरात सध्या मोकाट कुत्रे व डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्रे नागरिकांवर हल्ले करत असल्याच्या घटना घडत आहेत. विशेषतः लहान मुलांवर धावून जाण्याच्या प्रकारामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काही कुत्र्यांना त्वचारोग व इतर आजार झाल्याने त्यांच्या अंगावरील केस मोठ्या प्रमाणात गळून पडले आहेत. त्यामुळे हे कुत्रे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर फिरणार्‍या या आजारी कुत्र्यांमुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय शहरात मोकाट डुकरांची संख्याही वाढली असून मुख्य रस्ते, बाजारपेठ व निवासी भागांत डुकरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून घाणीचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप होत आहे. शहरातील मोकाट कुत्रे व डुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा, तसेच आजारी कुत्र्यांवर उपचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS